Breaking News

विशेष बातमी

१२ वीच्या विद्यार्थ्यांना मिळणार मार्क या पध्दतीने ; शासन निर्णय जारी १० वी, ११ वीचे मार्कावरून मिळणार १२ वीला गुण

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील १२ वीच्या विद्यार्थ्यांची परिक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेत या विद्यार्थ्यांचे मुल्यांकन करून उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परिक्षा न घेता मुल्यांकन कसे होणार याबाबतची उत्सुकता विद्यार्थ्यांसह विद्यार्थ्यांनाही होती. त्यानुसार १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मुल्यांकनासाठी १० आणि ११ वी परिक्षेतील गुण ग्राह्य धरण्यात येणार …

Read More »

राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिले हे उत्तर त्या निवडणूका न्यायालयाच्या आदेशाने मात्र कोरोनामुळे निवडणूका पुढे ढकलण्याची विनंती

ुंबई : प्रतिनिधी नुकतेच विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक घेणे, ओबीसींच्या रिक्त जागांसाठी घेण्यात येत असलेल्या निवडणूकांना स्थगिती देणे आणि अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याच्या अनुषंगाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित उचित कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यास उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेच तिसऱ्या लाटेचा इशारा …

Read More »

न्यायालयाच्या निकालामुळे भाजपा नेत्यांच्या दाव्यातील फोलपणावर शिक्कामोर्तब मराठा आरक्षणचा रस्ता आता लांब पल्ल्याचा

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षणप्रश्नी याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या धोरणाविरोधात निकाल देत मराठा समाज हा मागास नसल्याची टीपणी करत आरक्षण संपुष्टात आणले. त्यावर भाजपा नेत्यांनी आकाश पाताळ एक करत न्यायालयात राज्य सरकारने मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नसल्याचा आरोप करत आघाडी सरकारला आरक्षण देण्याची इच्छा नसल्याची टीका …

Read More »

ऑलिंम्पिक-२०२० साठी महाराष्ट्रातील हे ८ जण देशाचे प्रतिनिधीत्व करणार राज्यातील निवड झालेल्या खेळाडूंना क्रीडा मंत्री केदार यांनी दिल्या शुभेच्छा

मुंबई : प्रतिनिधी टोकीयो ऑलिंम्पिक – २०२० साठी राज्यातील निवड झालेल्या ८ खेळाडूंनी आप-आपल्या खेळामध्ये विक्रमांची उंच शिखरे गाठावीत, राज्य आणि देशासह माता-पित्यांचे नाव मोठे करावे अशा शुभेच्छा क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. टोकीयो ऑलिंम्पिक -२०२० चे आयोजन २३ जुलै ते ५ सप्टेंबर २०२१ दरम्यान करण्यात येणार …

Read More »

फडणवीसांच्या त्या मागण्यांवर “उचित कारवाई”चे राज्यपालांचे मुख्यमंत्र्यांना आदेश राजभवनाकडून पाठविलेले पत्र व्हायरल

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन दोन दिवसाचे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना भेटून अधिवेशनाचा कालावधी वाढविणे, ओबीसी आरक्षण, विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घेणे आदी  महत्वाच्या प्रश्नावर निवेदन दिले. त्यावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी या मागण्यांचा संदर्भ …

Read More »

मंत्रालयातील प्रवेशासाठी आता असे राहणार सुधारीत नियम: सर्वांसाठी लवकरच खुले राज्य सरकारकडून सुधारीत आदेश जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मंत्रालयात आमदार, खासदार यांच्यापासून ते सर्वसामान्य व्यक्तींसह विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकाऱ्यांना मंत्रालयात प्रवेश बंदी करण्यात आली होती. मात्र आता तब्बल दिड वर्षानंतर सर्वसामान्य नागरीकांपासून ते सर्वच शासकिय अधिकारी-कर्मचारी, महाराष्ट्रातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. तसेच सर्वसामान्य नागरीकांसह इतरांच्या वाहनांनाही …

Read More »

पदोन्नतीतील आरक्षण प्रश्न आणखी रखडणार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील समितीला दोन महिन्यांची मुदतवाढ

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्य सरकारच्या सेवेत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळण्यास आणखी कालावधी लागणार असून यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीला आणखी दोन महिन्याची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुढील काही काळ तरी याप्रश्नी निर्णय होणार नसल्याने हा विषय रखडण्याची शक्यता निर्माण झाली …

Read More »

सेट-नेट पीएचडीधारकांसाठी खुषखबर: रखडलेली प्राध्यापकांची भरती लवकरच उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे संघर्ष समितीला आश्वासन

पुणे : प्रतिनिधी मागील एकवर्षापासून कोरोना विषाणूमुळे रखडलेली प्राध्यापकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार असल्याचे आश्वासन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देत ही भरती ३ हजार ६४ रिक्त पदांसाठीची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. सेट-नेट पीएचडी पात्रता धारक संघर्ष समितीच्यावतीने २१ जून २०२१ रोजी पासून …

Read More »

ट्विटरने दिला केंद्रीय मंत्र्यालाच झटका केंद्रीय मंत्र्याचे अकाऊंट केले लॉक

नवी दिल्ली-मुंबई : विशेष प्रतिनिधी केंद्राच्या नव्या कायद्यावरून WhatsApp, Twitter ने न्यायालयात धाव घेतली आहे. तरीही केंद्र सरकारकडून ट्विटरला चांगलेच धारेवर धरण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे ट्विटर विरोधात केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद हे ट्विटरवरून देत असतात. मात्र आज त्यांचेच अकाऊंट ट्विटरने लॉक …

Read More »

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी: फि मध्ये २५ टक्के सूट सुमारे २० हजार विद्यार्थ्यांना फायदा- मंत्री उदय सामंत यांची घोषणा

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड-१९ ची उद्भवलेली परिस्थिती विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षांमध्ये शासकीय व शासन अनुदानित स्वायत्त संस्थेमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेतलेल्या  विद्यार्थ्यांना शिकवणी फी व्यतिरिक्त इतर शुल्कात १६ हजार २५० रूपयांची (अंदाजे २५%) सूट देण्यात येत असल्यची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. क्रांतीज्योती …

Read More »