Breaking News

विशेष बातमी

आता बौध्दधर्मियांना शाळेत प्रवेश घेताना धर्माच्या रकाण्यात हिंदू लिहिण्याची गरज नाही अनुसूचित जातीचे फायदेही मिळणार-सामाजिक न्याय विभागाचे सर्व आस्थापनांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी राज्यात १९५६ साली भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौध्द धम्माचा स्विकार केला. त्यानंतर हिंदू धर्मातील मागासवर्गीय समाजाने त्यांचे अनुकरण करत बौध्द धर्माचा स्विकार केला. परंतु बौध्द धर्माला अल्पसंख्याक स्थान दिल्याने धर्मातंरीत बौध्द व्यक्तींना अनुसूचित जाती अंतर्गत नाव नोंदविण्यासाठी शाळांसह अनेक ठिकाणी धर्माच्या रकाण्यात हिंदू …

Read More »

१० वी निकालाच्या संकेतस्थळाबरोबर विद्यार्थीही झाले हँग : ६ तासानंतरही बंदच ५ तासानंतरही १० वी निकालाचे संकेतस्थळ अद्यापही विद्यार्थी-पालकांसाठी बंद

मुंबई: प्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला टर्निंग पाँईट देणारे दरवर्षी १० वी आणि १२ वीचा परिक्षेचा निकाल जाहीर दरवर्षी ऑनलाईन पध्दतीने जाहीर होतात. मात्र गेल्या काही काळात या दोन्ही परिक्षेचा निकाल जाहिर होण्याच्या वेळेपासून चार तास, पाच तास संकेतस्थळच हॅग होण्याचे प्रकार वाढीला लागल्याने उत्सुकते आणि अधिरपणे १० वी चा निकाल पाहण्यासाठी …

Read More »

अखेर फडणवीसांच्या सूचनेसमोर मविआ सरकार झुकलेः ओबीसींचे सर्वेक्षण होणार भटक्या विमुक्तांचे स्वतंत्र लोकसंख्येवर आधारित सामाजिक व आर्थिक सर्वेक्षण करणार-विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे संपुष्टात आलेले आरक्षण पुन्हा परत मिळविण्यासाठी नुकत्या झालेल्या पावसाळी अधिवेशनात मोठे रणकंदन माजले. मात्र अखेर विधानसभेत ठराव एकमताने मंजूर करूनही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी समाजाचे सामाजिक, आर्थिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतला. पावसाळी अधिवेशनात फडणवीस …

Read More »

कोरोना लस निर्मितीसाठी हाफकिनला प्रतिक्षा केंद्राच्या निधीची राज्य सरकारकडून निधीची तरतूद मात्र केंद्राचे निधीबाबत कोणतेच उत्तर नाही

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि लस निर्माण करणाऱ्या कंपन्यांवरील लस निर्मितीचा येणारा ताण कमी करण्यासाठी भारत बायोटेकने तयार केलेली कोव्हॅक्सीन (Covaxin) लस हाफकिन इन्स्टीट्युटमध्ये निर्मिती करण्यास उशीरा का होईना कोविड सुरक्षा योजनेतंर्गत परवानगी दिली. त्यासाठी केंद्र- राज्याच्या हिश्शाने १५४ कोटी रूपयांचा प्रकल्प खर्च तयार करण्यात आला. परंतु …

Read More »

राज्याचे महत्वाकांक्षी इलेक्ट्रिक वाहन धोरण २०२१ जाहीर: काय आहे नेमके मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली घोषणा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरास मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. यासाठी वापरकर्ते आणि कंपन्यांना विविध प्रोत्साहने देणाऱ्या राज्याचे महत्वाकांक्षी असे इलेक्ट्रीक वाहन धोरण २०२१ ची आज राज्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घोषणा केली. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या धोरणास …

Read More »

महाराष्ट्राचा मास्टशेफ व्हायचाय? मग पाठवा आपला अर्ज या लिंकवर खाद्य संस्कृतीला चालना देण्यासाठी पर्यटन संचालनालयामार्फत स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच यामाध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसीपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली. स्पर्धेतील १५ सर्वोत्कृष्ट रेसीपींना प्रत्येकी १० हजार रुपये, ४० रेसीपींना प्रत्येकी ५ हजार रुपये तर उत्कृष्ट १०० रेसीपींना प्रत्येकी २ हजार रुपयांची बक्षीसे दिली जातील.  शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध …

Read More »

राज्य सरकारचे आदेश: मालमत्ता जाहिर करा अन्यथा कारवाईला सामोरे जा सामान्य प्रशासन विभागाचे सर्व विभाग, महानगरपालिका, मंडळे, नगर परिषदा, महामंडळांना निमशासकिय संस्थांना आदेश

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील सरकारी कर्मचारी-अधिकाऱ्यांबरोबरच सरकारशी संबधित सर्व संस्थामधील कर्मचारी-अधिकऱ्यांनी आपली मालमत्ता आणि दायित्वाची माहिती दरवर्षी राज्य सरकारकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र काहीजण ३१ मार्च पूर्वी आपली मालमत्ता सादर करत नसल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई आणि पदोन्नती नाकारण्याचे स्पष्ट आदेश संबधित विभागांना सामान्य …

Read More »

सर्वोच्च न्यायालय म्हणते, माहिती अधिकारातील कागदपत्रे विश्वासहार्य नसतात ए.एम.खानविलकर आणि संजीव खन्ना खंडपीठाने केली टिपण्णी

नवी दिल्ली-वृत्तसंस्था: प्रतिनिधी माहिती अधिकार कायद्यांतर्गंत मिळालेली कागदपत्रे ही खरीच आणि विश्वासार्ह असतील असे नसल्याची टिपण्णी सर्वोच्च न्यायालयाने करत वकिलांनी एकाच मुद्यावर अडून बसण्याचे सोडून द्यावे असा सल्लाही न्यायमुर्ती ए.एम.खानविलकर आणि न्या.संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने दिला. अलाहाबाद न्यायालयाने दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आशिषकुमार सक्सेना यांनी अपील केले. त्या याचिवेकवरील सुणावनी …

Read More »

राज्य सरकारकडून बदल्यांसाठी नवे आदेश: फक्त १५ आणि १० टक्केच होणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटे मुळे अत्यावश्यक असेल तरच बदली करण्याचा आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र आता त्यात थोडीशी शिथिलता आणत फक्त १५ टक्के कर्मचारी-अधिकाऱ्यांची बदली करण्यास राज्य सरकारने सर्व विभागांना परवानगी दिली असून ज्यांचा कालावधी विहित कालावधी पेक्षा जास्त झाला आहे अशांनाच प्राधान्य देण्याची सूचना …

Read More »

…आणि मंत्र्यांनीच केला नर्सेसचा सत्कार तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय... म्हणत मंत्री जयंतराव पाटलांनी परिचारिकांचा केला सत्कार

मुंबई : प्रतिनिधी तुम्ही लोकांसाठी अहोरात्र झटताय… तुम्ही पुढे या… म्हणत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सभागृहाच्या कोपर्‍यात उभ्या असलेल्या परिचारिकांचा पुष्पगुच्छ देत सन्मान केला… विशेष म्हणजे त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्यासोबत जयंतराव पाटील यांनी फोटोही काढले हा प्रसंग मुंबईच्या गोरेगाव येथील श्री साई क्लिनिक आणि पार्वतीबाई शंकरराव चव्हाण हॉस्पिटलच्यावतीने सुरू करण्यात …

Read More »