Breaking News

युक्रेनमध्ये अडकून पडलेला विद्यार्थी सांगतोय, मोदी सरकारची ती अफवा भारत सरकारचा आमच्याशी संपर्कच झालेला नाही

रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात येणार असल्याचा अंदाज असतानाही काहीही न करणाऱ्या भारत सरकारकडून कोणतीही हालचाल केली नाही. रशियाकडून प्रत्यक्ष हल्ल्याला सुरुवात झाली. त्यानंतर युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु केलेल्या भारत सरकारकडून तेथील अनेक विद्यार्थ्यांशी संपर्क साधल्याचा दावा करण्यात येत होता. मात्र प्रत्यक्षात भारत सरकारचा असा कोणताही संपर्क झाला नव्हता ती एक अफवा होती अशी सत्य परिस्थिती एका विद्यार्थ्याने सांगितली.

युक्रेनमधील दुसरे सर्वात महत्वाचे शहर असणाऱ्या खारकीव्हमधील हॉस्टेल बंकरमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्याने तेथील सत्य परिस्थिती सांगितली.

खारकीव्हमधील बंकरमध्ये अडकून पडलेल्यांपैकी श्रीधरन गोपालकृष्णन् या विद्यार्थ्याने भारतातील एका प्रतिष्ठीत दैनिकांशी बोलताना सांगितले की, आमच्याशी आतापर्यंत कोणीही संपर्क केलेला नाही. मूळ चेन्नईचा असणाऱ्या श्रीधरनने आम्ही सर्वजण आता हॉस्टेलमधील बंकरमध्ये लपलो आहोत. मात्र आम्हाला येथून कसे बाहेर काढण्यात येणार हे अद्याप आम्हाला ठाऊक नसल्याचेही त्याने सांगितले.

त्या केवळ अफवा आहे, भारतीय अधिकाऱ्यांकडून अद्याप आमच्याशी कोणताही संपर्क साधण्यात आलेला नसल्याचे श्रीधरनने स्पष्ट शब्दात सांगितलेय.

किव्ह आणि खारकीव्ह या पूर्वेकडील प्रमुख शहरांवर ताबा मिळवण्यासाठी रशियन लष्कराकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. मागील आठवड्यामध्ये रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर सुरु असणाऱ्या संघर्षामध्ये रशियन सैन्याचीही आता दमछाक होताना दिसतेय. तरीही रशियन हवाईदलाच्या माध्यमातून बॉम्ब वर्षाव सुरु आहे. असाच एक हल्ला आज म्हणजेच युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने खारकीव्हच्या मुख्य सरकारी इमारतीवर केला.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *