Breaking News

विशेष बातमी

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव आलेला आहे. त्यामुळे मिळेल त्या जमिनी थेट गुंतवणूकदारांच्या घशात घालण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. तर काही जणांकडून जमिनीची खोटी कागदपत्रे तयार करून जमिन लाटण्याचे प्रकारही सध्या सुरु झाले आहे. अशीच एक २१० एकर जमिन हडपण्याचा …

Read More »

गायीवरून सर्वोच्च न्यायालयाचा सवाल, अशा याचिका दाखल का करता? याचिका कर्त्याला फटकारले न्यायालयाने

गायीला राष्ट्रीय प्राणी जाहीर करण्याच्या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या याचिकेमध्ये गायींचं संरक्षण करण्याची मागणीही करण्यात आली होती. न्यायमूर्ती एस. एस. कौल आणि न्यायमूर्ती अभय ओक यांच्या खंडपीठासमोर याचिकाकर्त्यांना याचिका मागे घेण्याची परवानगी दिली आहे. याचिकाकार्त्यांच्या वकिलांनी भारत सरकारसाठी गायींची सुरक्षा हा फार महत्त्वाचा विषय असल्याचा …

Read More »

डायव्हिंगमध्ये मेधालीचे स्वप्नवत सुवर्णपदक तर ऋतिकाला ब्रॉंझपदक ऋतिकाची पदकांची हॅट्रिक

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मेधाली रेडकर हिने डायव्हिंग मध्ये राष्ट्रीय स्तरावर सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न साकार केले. तिची सहकारी ऋतिका श्रीराम हिने ब्रॉंझपदक पटकावित येथे तिसऱ्या पदकाची नोंद केली. एक मीटर स्प्रिंग बोर्ड प्रकारात मेधाली हिने लवचिकता व आकर्षक रचना याचा सुरेख समन्वय दाखवीत सुवर्णपदक जिंकले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरील तिचे …

Read More »

बीएसएनएलची ४ जीची तयारी, मग मोदींनी ५ जीचा शुमारंभ नेमका कोणासाठी? खाजगी कंपन्यासाठी तर नाही ना?

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायला लावून काही तात्पुरत्या लोकांच्या मनुष्यबळावर सध्या ही कंपनी चालविण्यात येत आहे. त्यातच बीएसएनएलकडून ५ जी सेवा पुढील वर्षी १५ रोजीपासून देशभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मग जवळपास ८ ते ९ महिने आधीच ५ जी सेवेचा …

Read More »

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपाताचा अधिकार

काही दिवसांपूर्वी अमेरिकत गर्भपातासंदर्भात वेगळा निर्णय दिला होता. त्यानंतर जगभरतील अनेक देशांमध्ये याबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. याच अनुषंगाने भारतातही यासंदर्भात प्रश्न उपस्थित करत एक याचिका दाखल झाली होती. त्यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने सुरक्षित गर्भपाताचा अधिकार विवाहीत असो किंवा अविवाहीत असो त्या सर्व महिलांना असल्याचा महत्वपूर्व निकाल दिला. एका २५ …

Read More »

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात येणार सिंहाची जोडी

गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लॉयन ) मुंबई येथील बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात लवकरच दिसणार आहे. या बदल्यात बोरिवली येथील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. गुजरातचे वन …

Read More »

सर्वात श्रीमंत असलेल्या तिरूपती देवस्थानची संपत्ती कोठे आणि किती माहित आहे का? ९६० जंगम मालमत्ता तर १४ टनाहून अधिक सोने, ठेवी वेगळ्या

तिरुपती बालाजी देवस्थान देशातल्या श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. देश-विदेशातून तिरुपती बालाजीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड गर्दी उसळलेली पाहायला मिळते. या मंदिराला मोठ्या प्रमाणात भाविक देगण्याही देतात. त्यामुळे मंदिराच्या संपत्तीची नेहमीच चर्चा असते. त्यात आता मंदिर प्रशासनाने आपली संपत्ती आणि मालमत्ता जाहीर केली आहे. तिरुपती मंदिराचे चेअरमन वाय वी सुब्बा रेडी …

Read More »

महाराष्ट्रातील एक अधिकारी आणि दोन विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार प्रदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्रातील कार्यक्रम अधिकारी सुशिल शिंदे यांच्यासह प्रतिक कदम आणि दिवेश गिन्नारे या विद्यार्थ्यांना उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती द्रोपदी मूर्मु यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सुशिल शिंदे हे मुंबईच्या कांदिवली भागातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी आहेत. त्यांना, राष्ट्रीय सेवा योजनेच्या उत्कृष्ट कार्यक्रम अधिकाऱ्‍याच्या पुरस्काराने …

Read More »

सातरच्या कास पठारासाठी ई-बस व बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण पर्यटनातून स्थानिक रोजगार वाढीसाठी व्यापक प्रयत्न करणार

सातारा जिल्ह्यातील कास पठारावरील पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार असून यासाठी आज राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते तिथे सुरू करण्यात येत असलेल्या ४ – ई बसेस, बायोटॉयलेट सुविधेचे लोकार्पण करण्यात आले.तेथील पर्यटनाला चालना देण्यासाठी वॉक वे तसेच दर्शन गॅलरी (व्हिव्हिंग गॅलरी) सुरू करणे,स्थानिकांना रोजगार वाढविण्यासाठी आराखडा तयार करणे, …

Read More »

‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी सामंजस्य करार

मराठवाड्याच्या उद्योग ‍क्षेत्राला पायाभूत चालना देणाऱ्या जालना येथे ‘मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ उभारण्यासाठी केंद्रीय मंत्री व राज्यमंत्री, महाराष्ट्राचे मंत्री व खासदार यांच्या उपस्थितीत नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. ‘जालना मल्टिमॉडेल लॉजिस्टिक पार्क’ प्रकल्प मराठवाडा आणि विदर्भाच्या विकासाची गती वाढण्यास महत्वाचा ठरेल, …

Read More »