Breaking News

विशेष बातमी

केंद्राचा तो प्रकल्प जाण्यामागचा घटनाक्रम काय? शिंदे-फडणवीसच याला जबाबदार शिंदे-फडणवीसांमुळेच राजकिय कुरघोड्यामुळे प्रकल्प गेला

मागील दोन-तीन दिवस राज्यातील केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्य आणि केंद्र शासित राज्यांना सौर ऊर्जा आणि अपांरपारीक ऊर्जेशी संबधित उत्पादन निर्मिती करण्यासंबधीच्या उद्योग निर्मितीचा १४०० कोटी रूपयांचा प्रस्ताव दिला. याबाबत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हा …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला ठणकावलं, हे वर्तन स्विकारण्या योग्य नाही

राज्यघटनाकारांनी घटनेची रचना करताना निकोप लोकशाहीसाठी चार स्वतंत्र यंत्रणांचे अस्तित्व मान्य केले. यातील पहिली यंत्रणा म्हणजे, कायदे मंडळ, त्यानंतर न्यायपालिका, प्रशासन आणि प्रसारमाध्यमं. परंतु कायदेमंडळ आणि न्यायपालिकांच्या कार्यकक्षा निश्चित कऱण्यात आलेल्या असल्या तरी अधूनमधून या दोन्ही यंत्रणांमध्ये संघर्ष निर्माण झालेला आपल्याला पाह्यला मिळाले. मात्र केंद्रात मोदी सरकार आल्यापासून पहिल्यांदाच सर्वोच्च …

Read More »

सुधा मुर्ती आणि संभाजी भिडेंच्या या फोटोमागील सत्य : आवर्जून वाचा

कालपासून एका कार्यक्रमानिमित्त सांगलीमध्ये आलेल्या ‘इन्फोसिस फाउंडेशन’च्या प्रमुख आणि आपल्या समाजकार्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सुधा मूर्ती यांनी शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांची भेट घेत त्यांच्या पाया पडल्याचे काही फोटो व्हायरल झाले. त्यामुळे बुध्दीमान आणि संवेदनशील असलेल्या सुधा मुर्ती या संभाजी भिडे यांच्या पाया कशा पडू शकतात असा सवाल अनेक नागरिकांना पडला …

Read More »

आर्थिक दुर्बल घटकांना सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाचा दिलासाः आरक्षण वैध

केंद्रात सत्तेत आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दुर्बल घटकांना न्याय देण्याच्या उद्देशाने १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेत त्याविषयीचा कायदा संसदेत मंजूरही केला. मात्र सर्वोच्च न्यायालयानेच दिलेल्या आदेशानुसार ५० टक्के अधिकचे आरक्षण देता येत नाही. मात्र हे आरक्षण देताना मोदी सरकारने १०३ व्या घटना दुरुस्ती केली. त्यास सर्वोच्च न्यायालयात …

Read More »

सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री पुन्हा असामान्य ? सीएमओत जाण्यासाठी मंत्रालयाची वेळ

साधारणत: तीन महिन्यापूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न झाले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे सातत्याने हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहेत असे सांगत कोणीतीही अडचण घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या अडी-अडचणी ऐकून घेत आणि त्यावर तात्काळ फोन करून पुढील आदेश देत असत. मात्र आता मुख्यमंत्री शिंदे यांना भेटण्यासाठी …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकाने नियुक्ती पत्र दिले मविआ काळात निवड झालेल्या उमेदवारांना

हिमाचल प्रदेश पाठोपाठ गुजरात विधानसभा निवडणूकीच्या तारखा आज जाहीर झाल्या. मात्र या दोन राज्यातील निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी रोजगार मेळावा घेत देशभरातील अनेक आधीच निवड झालेल्या बेरोजगार उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले. अगदी त्याच पार्श्वभूमीवर राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

न्यायालयाचा निकाल, पोलिस स्टेशन मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करणे म्हणजे गुन्हा नाही

एका वादावर तोडगा काढण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोलिसांकडून मध्यस्थी करत दोन्ही तक्रारदारांमध्ये साम्यंजस्य घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. परंतु यापैकी एकाने सदर चर्चेचे मोबाईलमधील कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग केले. त्यामुळे पोलिसांकडून सदर व्यक्तीच्या विरोधात आयपीसी ३ आणि ४ ऑफिसिएल सिक्रेट अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने …

Read More »

न्यायालयाचा निर्णयः पत्नीला घरातील कामे करायला सांगणे म्हणजे क्रुरपणा नव्हे

जर विवाहीत स्त्रीला अर्थात पत्नीला कुटुंबियासाठी घरातील कामे करायला सांगितले तर तो क्रुरपणा नव्हे तसेच काम सांगण्या मागचा उद्देश हा घरकाम करणाऱ्या मोलकरणीशी होऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला. औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कांकणवाडी आणि राजेश एस.पाटील या द्विसदस्यीय खंडपीठाने सारंग दिवाकर आमले विरूध्द …

Read More »

अखेर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डट यांच्या माघारीनंतर सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर यावर आलेल्या लिस ट्रॉस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अर्थमंत्र्यांनी जाहिर केलेल्या अर्थनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रॉस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील पंतप्रधान कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पेनी …

Read More »

चित्तथरारक सामन्यात भारताचा पाकिस्तानवर विजय टी २०त भारताची दमदार सुरुवात

टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज मेलबर्नमध्ये महामुकाबला झाला त्यात शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत वर्ल्डकपची दमदार सुरूवात केली. विराट कोहलीने ५३ चेंडूत ८२ धावा केल्या. त्यालाच सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. पाकिस्तानच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात खराब …

Read More »