Breaking News

न्यायालयाचा निर्णयः पत्नीला घरातील कामे करायला सांगणे म्हणजे क्रुरपणा नव्हे

जर विवाहीत स्त्रीला अर्थात पत्नीला कुटुंबियासाठी घरातील कामे करायला सांगितले तर तो क्रुरपणा नव्हे तसेच काम सांगण्या मागचा उद्देश हा घरकाम करणाऱ्या मोलकरणीशी होऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला.

औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायमुर्ती विभा कांकणवाडी आणि राजेश एस.पाटील या द्विसदस्यीय खंडपीठाने सारंग दिवाकर आमले विरूध्द इतर व महाराष्ट्र सरकार या खटल्यावरील सुनावणीवेळी वरील निर्णय दिला. त्याचबरोबर आयपीसी 498 A कलमाखाली पोलिसांमध्ये दाखल झालेला गुन्हा रद्द करण्याचे आदेशही या खंडपीठाने दिले.

जर विवाहीत स्त्रीला घर कामासंदर्भात विचारणा कऱण्यात आली असेल तर ती निश्चितच कुटुंबियाच्या उद्देशाने सांगितली गेली असेल. त्याचा अर्थ त्यामागे घरकाम करणाऱ्या मोलकरीणला सांगितले असा अर्थ असू शकत नाही. जर त्या विवाहित महिलेला घरकाम करायचे नाही तर तीने ते लग्नाआधीच सांगायला हवे. त्यामुळे विवाह करू इच्छिणारा नवरा लग्नाआधी किंवा लग्नानंतर त्याबाबत पुर्नविचार करू शकला असता आणि ही अडचण दूर होवू शकली असती असेही न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे.

याप्रकरणी विवाहीत स्त्रीने नवऱ्यासह सासरच्या मंडळी विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. त्याचबरोबर चारचाकी गाडी घेण्यासाठी ४ लाख रूपये मागितल्याचा आरोपही सासरच्या मंडळींवर ठेवण्यात आला. तसेच या कारणासाठी नवऱ्याकडून त्याच्या पत्नीची शाररीक आणि मानसिक छळवणूक करण्यात येत असल्याचा आरोपही पत्नीकडून करण्यात आला.

त्यामुळे नवऱ्याविरूध्द आयापीसी 498 A, 323 (स्वमर्जीने दुखावणे), 504 ( उद्देशापूर्ण दुखावणे) 506 (गुन्हेगारी उद्देश) आदींखाली गुन्हे दाखल करण्यात आले.

या विरोधात नवऱ्याने उच्च न्यायालयात धाव घेत करण्यात आलेले आरोप हे मनगढत किंवा खोटे आहेत. तसेच सदर महिला यापूर्वीही विवाहीत होती. तसेच त्या व्यक्तीवरही याच पध्दतीचे आरोप सदर महिलेकडून करण्यात आले होते. मात्र त्यावेळीही सदर महिलेच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली.

त्यावर न्यायालय म्हणाले की, मानसिक आणि शाररीक छळवणूक या दोन शब्दाचा वापर केला म्हणून सदर व्यक्तीच्या विरोधात 498 A हा गुन्हा दाखल करण्यास पुरेसे ठरू शकत नाही. तसेच या गोष्टी दाखविण्यासाठी सांगण्यात आलेले गोष्टीमुळे सदर व्यक्तीची निर्दयता आणि क्रुरता सिध्द होवू शकत नसल्याचे स्पष्ट केले.

पत्नीकडून नवऱ्यावर वारेमाप आरोप करण्यात येतात. म्हणून नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल लगेच होऊ शकत नाही असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्राथमिकस्तरावर पत्नीकडून नवऱ्य़ाच्या विरोधात आरोप करणे आणि त्या अनुषंगाने आरोप जमा करणे यामुळेही 498 A खाली नवऱ्यास शिक्षा होऊ होणे शक्य नाही. त्यासाठी 323, 504, 506 आणि आयपीसी 34 गुन्हाखाली क्रुरता सिध्द होईल अशा गोष्टींची काळजीही 498 A मध्ये विचार कऱण्यात आला नाही. त्यामुळे या वेगळ्या गुन्ह्यामुळे सदर व्यक्ती कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जा असे म्हणता येणार नसल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.

तसेच नवऱ्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेला गुन्हाही न्यायालयाने रद्दबातल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *