Breaking News

केंद्राचा तो प्रकल्प जाण्यामागचा घटनाक्रम काय? शिंदे-फडणवीसच याला जबाबदार शिंदे-फडणवीसांमुळेच राजकिय कुरघोड्यामुळे प्रकल्प गेला

मागील दोन-तीन दिवस राज्यातील केंद्र सरकारने देशभरातील सर्व राज्य आणि केंद्र शासित राज्यांना सौर ऊर्जा आणि अपांरपारीक ऊर्जेशी संबधित उत्पादन निर्मिती करण्यासंबधीच्या उद्योग निर्मितीचा १४०० कोटी रूपयांचा प्रस्ताव दिला. याबाबत विद्यमान उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्याचे सांगत शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हा प्रकल्प गेला नसल्याचा दावा केला.  परंतु हा प्रस्ताव केंद्र सरकारकडून महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात आला. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या हालचालींना जोर चढला होता. त्यामुळे शिंदे-फडणवीसांच्या राजकिय कुरघोड्यांच्या नादात हा प्रकल्प महाराष्ट्रातून गेल्याची माहिती मराठी ई-बातम्या.कॉम (www.marathiebatmya.com) या संकेतस्थळास उपलब्ध झालेल्या कागदपत्रांच्या आधारे पुढे आली.

केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून ऊर्जा निर्मिती आणि अपांरपारीक ऊर्जेशी संबधित यंत्रणांच्या निर्मितीसाठी मॅन्युफॅक्चरिंग हब निर्माण करण्यासाठीचा प्रस्ताव त्यावेळच्या राज्यातील महाविकास आघाडीसर देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना पाठविण्यात आले. हा प्रस्ताव पाठविण्याची तारीख २७ मे २०२२ रोजीचा आहे. हा प्रस्ताव २८ पानांचा असून या प्रस्तावात राज्य सरकारने सादर करावयाच्या कागदपत्रांची फॉर्मेट आणि कोणती कागदपत्रे सादर करायची आहेत. याबदलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याकडे हा प्रस्ताव प्राप्त झाला. त्यावेळी राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी जून महिन्यात निवडणूका होऊ घातल्या होत्या. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठीची निवडणूक १९ जून २०२२ रोजी पार पडलेल्या रात्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील ११ आमदारांना घेवून सूरतच्या दिशेने रवाना झाले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी विधान परिषदेतील उर्वरित एका जागेचा निकाल मध्यरात्रीनंतर २.३० वाजता लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्थात २० जूनला एकनाथ शिंदे हे काही आमदारांना घेऊन सूरतला असल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पुढील ८ ते ९ दिवस शिवसेनेतील हे बंड मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे प्रयत्नाशील होते. त्याच कालावधीत शिवसेनेतील अनेक आमदार, मंत्री हे एकनाथ शिंदे यांना जा‌ऊन मिळत होते. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे अल्पमतात आले. त्यातच एकनाथ शिंदे हे आपल्या समर्थक आमदारांना घेवून सूरतहून पुढे आसामची राजधानी गुवाहाटी येथे गेले.

अखेर २९ जून २०२२ रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेवटची कॅबिनेट मिटींग घेत राजीनामा देणार असल्याचे संकेत देत राजीनामा दिला. त्यानंतर ३० जूनला रितसर एकनाथ शिंदे आणि भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

दरम्यान, केंद्र सरकारने पाठविलेल्या पत्रानुसार ऊर्जा निर्मितीशी संबधित प्रकल्पाबाबतची राज्य सरकारकडून २६ जून रोजी पर्यंत प्रत्तुतर देण्याची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र राज्यातील अस्थिर राजकारणामागे असलेल्या शिंदे-फडणवीस यांच्या राजकिय फायद्यासाठी या प्रकल्पासाठीची कागदपत्रे आणि सूचना पाठविण्याची मुदत संपून गेली. त्यामुळे राज्य सरकारकडून अधिकृत यावर विचारही झाला नाही आणि त्यावरील उत्तरही पाठविले गेले नाही.

घटनाक्रम खालीलप्रमाणे

१ जून ते १९ जून दरम्यान राज्यसभा आणि विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक

१९ जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे ११ आमदारांना घेवून सूरतला रवाना

२० जून २०२२- एकनाथ शिंदे सूरत, नंतर गुवाहाटी आणि गोवा

२९ जून २०२२-उध्दव ठाकरे यांनी दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा

३०जून २०२२- रितसर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली

२७ मे २०२२- ऊर्जा निर्मितीसाठी मॅन्युफॅक्चरींग उद्योग निर्मितीसाठी केंद्र सरकारचे राज्याला पत्र

२६ जून २०२२-रोजी प्रस्ताव पाठविण्याची अंतिम मुदत

केंद्र सरकारने पाठविलेल्या प्रस्तावाची प्रत:

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *