Breaking News

अखेर ब्रिटनच्या पंतप्रधान पदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक बोरिस जॉन्सन आणि पेनी मॉर्डट यांच्या माघारीनंतर सुनक यांच्या नावावर शिक्कामोर्तब

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर यावर आलेल्या लिस ट्रॉस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे अर्थमंत्र्यांनी जाहिर केलेल्या अर्थनीतीमुळे मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला होता. त्यामुळे लिझ ट्रॉस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पुढील पंतप्रधान कोण? अशी उत्सुकता निर्माण झाली. मात्र पुन्हा एकदा पंतप्रधान पदासाठी माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन आणि पेनी मार्डट यांच्या नावाची चर्चा सुरू झाली. मात्र अखेर भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्या नावावर एकमत झाले आणि आता ते लवकरच पंतप्रधान पदाची शपथ घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच ब्रिटनचे पंतप्रधान बनणारे ऋषी सुनक हे पहिलेच भारतीय वंशाचे व्यक्ती बनले आहेत.

ब्रिटनच्या पंतप्रधान पदी लिझ ट्रॉस या विराजमान झाल्यानंतर त्यांच्या अर्थमंत्र्यांनी श्रीमंताना करांमध्ये मोठ्या प्रमाणावर कर सवलत जाहिर केली होती. त्यामुळे स्थानिक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला. त्यामुळे जनतेला दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करू शकत नसल्याने आपण पंतप्रधान पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहिर केले. त्यामुळे पंतप्रधान पदी कोण? असा सवाल विचारण्यात येवू लागला.

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पुन्हा पंतप्रधान होण्यासंदर्भातील शक्यतांचा अंदाज घेत रिंगणातून माघार घेतली होती. ऋषी सुनक यांच्यासमोर आणि पेनी मॉर्डंट यांचं आव्हान होतं. मात्र, पेनी मॉर्डंट यांनी माघार घेतल्यानं ऋषी सुनक नवे पंतप्रधान झाले आहेत.

ऋषी सुनक आता इन्फोसीस कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे ते जावई आहेत. तसेच सुनक यांनी यापूर्वी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमध्ये अर्थमंत्री म्हणून देखील काम केलं आहे. ऋषी सुनक यांचा जन्म १९८० साली लंडनमध्ये झाला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील एका बँकेतून नोकरीला सुरुवात केली. काही कालावधीनंतर त्यांनी ब्रिटनच्या राजकारणात भाग घेतला. ऋषी सुनक यांचे शिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठात झाले आहे.

Check Also

अखेर मालदीव बरोबरचे संबध दृढ करण्यासाठी चीन घेतोय पुढाकार

साधारणतः दोन महिन्यापूर्वी मालदीव मधील निवडणूका पार पडल्या या निवडणूकीत भारतीय वंशाचे मोहम्मद मोईझु यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *