Breaking News

विशेष बातमी

फडणवीसांच्या “डंके की चोट”वर जयंत पाटील म्हणाले “फारच बोअर आहे” द काश्मीर फाईल्सवरून जयंत पाटील यांचा चिमटा

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झालेले असताना या चित्रपटाचे पडसाद अधूनमधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटताना दिसून येत आहे. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांना चिमटे काढल्याचे दृष्य सभागृहात पाह्यला मिळाले. विधानसभेत काही सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही चित्रपट बघायला गेला …

Read More »

पोलिस भरती होवू इच्छिणाऱ्यांसाठी खुषखबर ! NCC प्रमाणपत्र असल्यास मिळणार गुण क्रिडा मंत्री सुनील केदार यांनी दिली माहिती

सध्या राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असून काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना आगामी काळात ७ हजार २३१ पदांवर पोलिस शिपाई भरती करणार असल्याचे जाहीर केले. तर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनातच एनसीसी प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना पोलीस भरतीमध्ये गुण देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मात्र ते …

Read More »

जपानच्या पंतप्रधानांनी केली भारतात ३.३ लाख कोटींच्या गुंतवणूकीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर संयुक्त पत्रकार परिषदेत घोषणा

जपानचे पंतप्रधान शिंजो अबे यांच्यानंतर आता पंतप्रधान फुमियो किशिदा हे दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर पंतप्रधान किशिदा आणि मोदी यांनी संयुक्तरित्या प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. त्यावेळी पंतप्रधान किशिदा यांनी आगामी काही वर्षात भारतात ३.३ लाख कोटी डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. १४ व्या …

Read More »

मराठवाड्यातील या प्रकल्पासाठी इस्त्रायलने केला हात पुढे इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यपालांना माहिती

मराठवाड्यातील पाण्याच्या  दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अश्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची  माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली. इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल …

Read More »

कर्नाटक न्यायालयाचा निर्णय, हिजाब धार्मिक प्रथा नाही, भगवी वस्त्रेही घालायची नाहीत न्यायालयाच्या निर्णयाचे मुस्लिम समुदायाबरोबरच सर्वचस्तरात उमटल्या प्रतिक्रिया

जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या हिसाब प्रकरणाच्या सुणावनीवर आज अंतिम निर्णय दिला असून या निर्णयात कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने राज्य सरकारचा निर्णय उचलून धरला आहे. राज्य सरकारने हिसाब परिधान करून शाळा, कॉलेजात येण्यास मज्जाव केला होता. न्यायालयानेही याच निर्णयाला मंजूरी देत हिसाब परिधान करणे हा काही …

Read More »

दुपारपर्यंत ट्रेडिंगवर तरी पाच राज्यात भाजपा आणि आप च संभावित काँग्रेसेतर आघाडीला सुरुंग

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहिर होण्यास सुरुवात झाली. मात्र या निकालाने प्रत्यक्ष चित्र आणि ओपिनियन पोल यावेळी जवळपास सारखेच आल्याचे चित्र दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दुपारपर्यंत असलेल्या …

Read More »

भाजपा आमदाराने दिली शिवसेनेची घोषणा आणि सेनेचे आमदार गांगरले… विधानभवन परिसरात ऐकायला मिळाली घोषणा

राज्यात काही ठराविक राजकिय नेत्यांच्या आगमनाप्रित्यर्थ कार्यकर्त्यांकडून एक विशिष्ट घोषणा देण्याची पध्दत मागील वर्षात रूढ झाली होती. परंतु हल्ली ही पध्दत दिसेनाशी झाली असताना आज अचानक शिवसेनाप्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आगमनावेळी शिवसैनिकांकडून देण्यात येणारी घोषणा आज विधानभवन परिसरात ऐकायला मिळाले शिवसेनेचे आमदारही काही काळ गांगरल्याचे चित्र पहायला मिळाले. …

Read More »

मोदींची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा पुतीन यांनी दिला शब्द आणि मोदींनी केली सूचना

रशिया आणि युक्रेनमध्ये २४ फेब्रुवारीपासून सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुपारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर त्यानंतर काही वेळांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केली. मोदींनी झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटे चर्चा केली तर पुतिन यांच्यासोबत मोदींचा कॉल जवळजवळ ५० मिनिटे सुरु होता …

Read More »

निवडणूक निकाला आधीच काँग्रेस घेतेय खबरदारी वरिष्ठ नेते पाठविले चार राज्यांमध्ये

गोवा, मणिपूर, उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंड या पाच राज्यातील मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. मात्र हा मतदानाचा टप्पा संपण्याआदीच काँग्रेसने मागील काही वर्षांमधील घडामोडींमधून धडा घेत सावध पावले आधीच उचलण्यास सुरुवात केली असून आधीप्रमाणे अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींमुळे पक्षाला बसलेला फटका आणि हातची सत्ता जाण्यासारखे प्रकार यंदा काँग्रेसला टाळायचे …

Read More »

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे अधिकार आता राज्य सरकारला राज्य निवडणूक आयोग फक्त पाच महापालिकांच्या निवडणूका घेणार

राज्यातील ओबीसी समाजाचे गेलेले राजकिय आरक्षण परत मिळत नाही. तोपर्यंत निवडणूका घ्यायच्या नाहीत या महाविकास आघाडी सरकारच्या धोरणानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीचे सर्वाधिकार आज राज्य सरकारने स्वतःकडे घेत त्या विषयीची तीन विधेयके राज्याच्या विधानसभेत मंजूर करण्यात आले. यासंदर्भातील विधेयक नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मांडले तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, …

Read More »