Breaking News

दुपारपर्यंत ट्रेडिंगवर तरी पाच राज्यात भाजपा आणि आप च संभावित काँग्रेसेतर आघाडीला सुरुंग

संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, मणिपूर आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणूकांचे निकाल जाहिर होण्यास सुरुवात झाली. मात्र या निकालाने प्रत्यक्ष चित्र आणि ओपिनियन पोल यावेळी जवळपास सारखेच आल्याचे चित्र दिसत आहे. मात्र उत्तर प्रदेशात भाजपाची सत्ता जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु दुपारपर्यंत असलेल्या ट्रेडिंगवर भाजपाचीच आघाडी असल्याचे तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला पिछाडीवर टाकल्याचे दिसून येत आहे.

दुपारपर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांपैकी भाजपा २६२ जागांवर आघाडीवर ६० जागांचे नुकसान होताना दिसत आहे. तर समाजवादी पार्टी आघाडीला १३६ जागांवर आघाडी मिळत असल्याचे दिसून येत असून ७९ जागांचा फायदा होताना दिसत आहे. काँग्रेसला अवघ्या २ जागांवर तर बसपाला अवघ्या १ जागेवर आघाडी मिळल्याचे दिसून येत आहे.

पंजाब विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसला सत्ता कायम राखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसने फक्त १८ जागांवर आघाडी असल्याचे तर ५९ जागांवर पराभवाच्या छायेत असल्याचे दिसून येत आहे. तसेच अकाली दलास ४ आणि भाजपाला फक्त २ ठिकाणी विजय मिळविता आला आहे. त्यामुळे पंजाबमधील सत्ता राखण्यात काँग्रेसला जवळपास अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

उत्तराखंड विधानसभा निवडणूकीत भाजपाला पुन्हा एकदा सत्ता मिळताना दिसत असून ४८ जागांवर भाजपाला आघाडी दिसून येत असून फक्त ९ जागांवर पिछाडी असल्याचे दिसून येत आहे. मात्र काँग्रेसच्या जागांमध्ये यावेळी वाढ झाल्याचे दिसून येत असून १८ जागांवर आघाडी असल्याचे दिसून येत असून ७ जागा त्यांना अतिरिक्त मिळत असल्याचे दिसून येत आहे. येथेही बसपा आणि इतरांना २ जागा मिळत असल्याचे दिसून येत आहे.

गोवा विधानसभेत पुन्हा एकदा भाजपाच सत्तास्थानी बसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून भाजपाला १९ जागी विजय मिळाल्याचे दिसून येत असून काँग्रेसला १२ जागी विजय मिळाल्याचे दिसून येत आहे. आम आदमी पार्टी आणि तृणमूल काँग्रेसला प्रत्येकी ३ जागा मिळत असल्याचे स्पष्ट होत आहे. तर इतरांना ३ जागा मिळत आहेत. मात्र माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

मणिपूर विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक जागा भाजपाला मिळताना दिसून येत असून काँग्रेसला फक्त ६ जागांवर विजय मिळत असल्याचे दिसून येत असून २२ जागांवर पिछाडीवर असल्याचे दिसून येत आहे. एनपीपी पक्षाला ९ जागांवर आघाडी असून ५ जागां त्यांना जास्तीच्या मिळत असल्याचे दिसत आहे. जनता दल युनायटेडलाही ६ जागांवर आघाडी असून इतरांना १० जागा मिळत आहेत.

या निकालाने काँग्रेसेतर पक्षांच्या आघाडीला आता अस्तित्वात येण्यापूर्वी सुरुंग लागल्याचे दिसून येत आहे.

Check Also

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *