Breaking News

मोदींची युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की आणि रशियाचे सर्वेसर्वा पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा पुतीन यांनी दिला शब्द आणि मोदींनी केली सूचना

रशिया आणि युक्रेनमध्ये २४ फेब्रुवारीपासून सुरु असणाऱ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुपारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की यांच्यासोबत फोनवरून चर्चा केल्यानंतर त्यानंतर काही वेळांनी पंतप्रधान मोदींनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासोबत चर्चा केली. मोदींनी झेलेन्स्कींसोबत ३५ मिनिटे चर्चा केली तर पुतिन यांच्यासोबत मोदींचा कॉल जवळजवळ ५० मिनिटे सुरु होता अशी माहिती एएनआयने सरकारी सुत्रांच्या हवाल्याने दिली.

पंतप्रधान मोदी आणि पुतिन यांच्यामध्ये यापूर्वी युद्ध सुरु झाल्यापासून फेब्रुवारी २४ आणि तीन मार्च रोजी चर्चा झालेली होती.

यावेळी पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना थेट युक्रेनशी चर्चा करावी असा सल्ला दिला. पंतप्रधान मोदींनी पुतिन यांना त्यांच्या टीमच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या वाटाघाटीच्या चर्चेच्या सत्रांबरोबरच थेट चर्चाही करावी असा सल्ला दिल्याचे सुत्रांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी दोन्ही देशांनी चर्चा करुन सुरक्षित मार्ग तयार करण्यासाठी युद्धविरामासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल दोन्ही पक्षांचे कौतुक केले. या युद्धबंदीच्या घोषणेमध्ये सुमी शहराचाही समावेश असून तेथे हजारो भारतीय अजूनही अडकून पडलेत. या शहराचा उल्लेखही मोदींनी केल्याचे सुत्रांनी सांगितले.

लवकरात लवकर सुमी शहरामधून भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या मुद्द्यावर जोर देत पंतप्रधानांनी या गोष्टीचे महत्व पुतिन यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला. सुमीमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षित बाहेर काढण्यासंदर्भात राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना आश्वस्त करत शब्द दिल्याची माहिती एएनआयच्या सुत्रांनी दिली.

Check Also

तहसीलदाराने उघडकीस आणले जमिन हडप करण्याचा प्रकार, मंत्र्याकडून मात्र दबाव

मागील काही वर्षात कोकणात अनेकविध प्रकल्प येत आहेत. या पार्श्वभूमीवर कोकणात जमिनीला सध्या सोन्याचा भाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *