Breaking News

फडणवीसांच्या “डंके की चोट”वर जयंत पाटील म्हणाले “फारच बोअर आहे” द काश्मीर फाईल्सवरून जयंत पाटील यांचा चिमटा

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून सध्या विविध मतप्रवाह निर्माण झालेले असताना या चित्रपटाचे पडसाद अधूनमधून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात उमटताना दिसून येत आहे. मात्र यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी हा चित्रपट पाहिला. त्यावरून सत्ताधाऱ्यांकडून फडणवीसांना चिमटे काढल्याचे दृष्य सभागृहात पाह्यला मिळाले.

विधानसभेत काही सदस्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना तुम्ही चित्रपट बघायला गेला होतात म्हणे अशी विचारणा केली. त्यावर फडणवीस म्हणाले की, होय मी डंके की चोट पे सांगतो की मी द काश्मीर फाईल्स हा चित्रपट बघायला गेलो होतो. त्यावर तालिका अध्यक्ष संजय शिरसाट म्हणाले विरोधी पक्षनेते आम्हालाही न्या चित्रपट बघायला.

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पॉंईट ऑफ प्रोसिजर अन्वये मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, पुरवणी मागण्यावर मागील तीन दिवसांपासून चर्चा सुरु आहे. या चर्चेत सत्ताधारी पक्ष आणि मंत्र्यांना ४ तास ५० मिनिटे तर विरोधी पक्षाला २ तास ४० मिनिटे इतका वेळ मिळाला. सरासरी विचार केला तर जवळपास ७ तास चर्चा झाली. सत्ताधारी वर्गाला मिळालेल्या वेळेचा विचार केला तर आम्हाला विरोधकांना कमी वेळ मिळाला आहे. वास्तविक पाहता ३ तास ३० मिनिटे विरोधकांना आणि तितकाच वेळ सत्ताधारी यांना मिळायला हवा होता. पण हरकत नाही इथून पुढे समसमान वेळ मिळायला हवी अशी मागणी केली.

त्यावर काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले की, ही वेळ कोठून आणली. काँग्रेसचे सदस्य तर बोललेच नाहीत. ही वेळेची आकडेवारी काय मनानेच आणली नाही ना ? असा सवालही केला.

त्यावर मध्येच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी विरोधी पक्षनेते काल पिक्चर बघायला गेले होते, कसा होता पिक्चर अशी विचारणा फडणवीस यांना केली. त्यावर फडणवीस म्हणाले की, होय मी काल बाहेर पिक्चर बघायला गेलेलो आणि डंके की चोट पे सांगतो पिक्चर बघायला गेलो होतो. त्यावेळी तालिका अध्यक्ष संजय सिरसाट म्हणाले काय विरोधी पक्षनेते आम्हालाही न्यायचे ना चित्रपट बघायला आम्हीही आलो असतो.

फडणवीस यांच्या डंके की चोट पे च्या वक्तव्याचा धागा पकडत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील बोलायला उभे राहीले, विरोधी पक्षनेते द काश्मीर फाईल्स चित्रपट इंटरवलनंतर फारच बोअर आहे हो. मात्र या चित्रपटाने भरपूर गल्ला केला आहे. त्यामुळे त्या चित्रपट दिग्दर्शकाला सांगा त्यातील काही पैसे काश्मीरी पंडीताच्या घरासाठी दान करायला अशी कोपरखळीही लगावली.

मात्र मध्येच भाजपाचे योगेश सागर यांनी खाली बसून बोलण्यास सुरुवात केली. त्यावर जयंत पाटील म्हणाले माझे झाल्यावर बोला. तरीही ते बोलू लागल्याने अखेर जयंत पाटील म्हणाले आमचे ही लोक जर खाली बसून बोलायला लागले तर चांगलीच पंचाईत होईल.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

अखेर भारताने युनोत केले इस्त्रायलच्या विरोधात मतदान

इस्त्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीत हमासला नेस्तानाभूत करायचे म्हणून पॅलिस्टीनी नागरिकांवर हल्ले करत त्यांना हुसकावून लावत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *