Breaking News

युक्रेनच्या चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ताबा पंतप्रधान डेन्यस स्मॅहल यांची माहिती

मागील तीन दिवसांपासून युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाई करण्यास सुरुवात केलेल्या रशियाने आज युक्रेनच्या आतील भागात मोठ्या प्रमाणावर बॉम्बहल्ले करत मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. तसेच महत्वाचा असलेल्या चर्नोबेल अणुऊर्जा प्रकल्पावरही रशियाने आज ताबा मिळविला असल्याची माहिती युक्रेनचे पंतप्रधान डेन्यस स्मॅहल (Denys Shmyhal) यांनी व्हिडीओच्या माध्यमातून आज दिली.

रशियाने दोन दिवसापूर्वी हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर सुरुवातीला रशियन लष्कराने युक्रेनच्या लष्करी तळांना लक्ष्य केले. त्यानंतर लष्कराच्या गोदामांना लक्ष्य केले. मात्र सुरुवातीला युक्रेनच्या लष्कराकडून प्रतिवाद करण्यात प्रयत्न करण्यात आला. त्यात रशियाच्या दोन हेलिकॉप्टरचा समावेश असल्याचे युक्रेनच्यावतीने सांगण्यात आले. परंतु जसजसा वेळ जायला लागला. तसा युक्रेनवरील हल्ल्याची तीव्रता रशियाने वाढविली. त्यामुळे युक्रेनमध्ये अनेक नागरी वसाहतीतील इमारतींचे नुकसान झाले. आतापर्यंत ११०० हून अधिक नागरीकांचा या लष्करी हल्ल्यात मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.

चर्नोबेल अणु ऊर्जा प्रकल्प असलेला भाग हा सेन्सेटीव्ह भाग म्हणून ओळखला जातो. येथील परिसरात फारशी नागरी वस्ती नाही. मात्र त्यावर रशिया आणि युक्रेनचा संयुक्त बंदोबस्त होता. परंतु या संपूर्ण परिसर, तेथील इमारती आणि अणु ऊर्जा प्रकल्पावर आता पूर्णत: रशियाने ताबा मिळविला आहे.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *