Breaking News

काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना मातृशोक इटलीत राहत्या घरी त्यांच्या आईचे निधन

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आई पाऊलो मायनो यांचं इटलीत निधन झालं आहे. २७ ऑगस्टला पाऊलो मायनो याचं निधन शनिवारी झालं आहे. त्यांच्यावरती मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याबाबत काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ट्विट करुन माहिती दिली.

सोनिया गांधी मागील आठवड्यात आपल्या आईंना भेटण्यास इटलीला गेल्या होत्या. त्यांच्यासमवेत राहुल गांधी, प्रियंका गांधी-वड्रा सुद्धा होते. दरम्यान, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वड्रा या सातत्याने आपल्या आजींना भेटण्यास जात असे. २०२० साली राहुल गांधी सतत विदेशात जात होते, तेव्हा त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. त्यावर राहुल गांधी हे इटलीतील आजारी नातेवाईकास भेटण्यास जात आहेत, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाऊलो मायनो यांच्या निधनाचे वृत्त समजताच ट्विट करुन श्रद्धांजली वाहिली. सोनिया गांधीजी यांच्या आई श्रीमती पाऊलो मायनो यांचं निधन झालं आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. या दु:खाच्या प्रसंगी आमच्या संवेदना संपूर्ण कुटुंबासमवेत आहेत, असा शोक पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.

Check Also

खाते वाटपात भाजपाच्या तुलनेत शिंदे गटाला काय मिळाले आणि आणखी काय मिळणार? महत्वाची खाती वगळता तोफेच्या तोंडी शिंदे गटाचे मंत्री

हिंदूत्वाच्या मुद्यावरून आणि आम्हाला चांगली खाती पाहिजेत असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शिवसेनेतील …

Leave a Reply

Your email address will not be published.