Breaking News

विशेष बातमी

तरूणांच्या आंदोलनासमोर केंद्राची थोडीशी माघार; अग्निपथ योजनेत आता या सवलती देशातील तरूणांकडून माघार नाहीच

लष्कराच्या तिन्ही दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अग्निपथ योजनेला तरूणांचा वाढता विरोध काही केल्या कमी होण्यास तयार नाही. मागील तीन दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमधील तरूणांकडून या योजनेच्या विरोधात रेल्वे स्टेशन्सवर दगडफेक, जाळपोळीच्या घटना आदी घडताना दिसत आहे. त्यातच आज काही राज्यांमध्ये या तरूणांकडून …

Read More »

योगी सरकारच्या बुलडोझरला सर्वोच्च न्यायालयाचा लगाम पुढील सुनावणी २१ जूनला

मागील काही महिन्यापासून उत्तर प्रदेशात झालेल्या जातीय हिंसाचाराला फक्त विशिष्ट समुदायातील व्यक्तींना जबाबदार ठरवून त्या व्यक्तींच्या घरावर बुलडोझर चालवित नेस्तानाभूत करण्याचे प्रकार उत्तर प्रदेशातील योगी सरकारने सुरू केले. या निर्णयामुळे अनेक निष्पाप व्यक्तींवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आणि त्या व्यक्तींच्या घरांवर जाणीवपूर्वक बुलडोझर चालवित बेघर करण्याच्या घटना उघडकीस आल्यानंतर …

Read More »

महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला कोणी महाव्यवस्थापक देता का ? २०१४ सालापासून महामंडळाला महाव्यवस्थापकच नाही

राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजामधील नवतरूण आणि नवउद्योजकांना भाग भांडवल उपलब्ध करून देता यावे किंवा त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारने महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली. मात्र या आर्थिक विकास महामंडळाला मागील ९ वर्षापासून महाव्यवस्थापकच मिळेना झाला आहे. त्यामुळे महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाला …

Read More »

RTE कायदा असतानाही महाराष्ट्रात ५५ हजार मुलं शिक्षणापासून वंचित शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणार-शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

‘बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क’ अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग प्रयत्नशील असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली. नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेच्या परिसरातील ६ ते १४ वयोगटातील विद्यार्थ्यांचे प्रवेश झाल्याची खात्री करून शाळापूर्व तयारीच्या काळात शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध …

Read More »

व्हॉट्सअॅपमध्ये आले नवे फिचर, ग्रुप सदस्य वाढविता येणार दुपटीने या गोष्टींचा समावेश नव्या फिचरमध्ये

फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतल्यापासून त्यामध्ये नवनव्या फिचरची भर टाकत ते अधिकाधिक लोकपयोगी बनविण्याचा प्रयत्न मेटा कंपनीकडून करण्यात येत आहे. मागील काही काळात एका ग्रुपवरील सदस्यांना एकाचवेळी ग्रुप कॉल करता येण्याचे फिचर अॅड केल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठविण्याची सुविधाही सुरु कऱण्यात आली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मधील सदस्यांची संख्या दुपटीने वाढविता येण्याची …

Read More »

भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी आले आजारी लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक दोघेही अॅम्ब्युलन्समधून आले एक जण व्हिल चेअर तर दुसऱ्याला स्ट्रेचरवरून आणले

राज्यसभा निवडणूकीसाठी आज मतदान होत असताना आज दोन परस्पर विरोधी चित्र पाह्यला मिळाले. त्यातील एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तथा मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्यसभा निवडणूकीसाठी मतदान करता यावे याकरिता न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसऱ्याबाजूला भाजपाच्या दोन आमदारांनी स्वतःची शाररीक स्थिती आणि आरोग्य चांगले …

Read More »

मीम्सचा चेहरा बनलेले पाकिस्तानचे अँकर आमीर लियाकत हुसैन यांचे निधन वयाच्या ४९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचा संशय

भारतातील जवळपास अनेक मीम्समध्ये दाढीवाल्या एका व्यक्तीचा हसतानाचा आणि वाह.. वाह असे म्हणताचा व्हिडिओ आपण सर्रास पाहिला असेल. त्या व्यक्तीची माहिती फारशी कोणाला माहिती नाही. परंतु त्या व्यक्तीचा व्हिडिओ अनेक मीम्समध्ये वापरला गेल्याने ती व्यक्ती म्हणजेच मीम्स अशी एकप्रकारे समीकरण जुळले होते. मात्र त्या दाढीवाल्या व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून …

Read More »

आपल्याच आमदारांवर अविश्वास का? म्हणणाऱ्या भाजपाकडूनही ‘ताज’वर व्यवस्था महाविकास आघाडीवर टीकास्त्र आशिष शेलार यांनी केले होते

राज्यसभेच्या ६ व्या जागेसाठी शिवसेनेकडून ४ था उमेदवार तर भाजपाकडून ३ रा उमेदवार जाहिर केल्यानंतर या निवडणूकीतील चुरस निर्माण झाली. खबरदारीचा उपाय म्हणून महाविकास आघाडीकडून त्यांच्या समर्थक आमदारांना पंचतारांकीत हॉटेलमध्ये स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला. त्यावर भाजपाचे आमदार आशिश शेलार यांनी टीका केली. मात्र आता भाजपाकडूनही खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या सर्व …

Read More »

संजय राऊत म्हणाले, “त्या” वक्तव्यावरून भाजपा आखाती देशांकडे माफी मागतेय नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केल्यानंतर राऊतांची टीका

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टीप्पणी केल्यानंतर आखाती प्रदेशातील भारताबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय मालावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर भाजपाने नूपुर शर्मा यांना भाजपामधून सहा वर्षासाठी निलंबित केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, …

Read More »

केंद्राकडून नुकसान भरपाई बंद होणार, मविआला चिंता तुटीची रक्कम आणायची कोठून? १ जुलैपासून केंद्राकडून मिळणारी नुकसान भरपाई बंद होणार

एक देश एक कर या घोषणेनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ जुलै २०१७ रोजीपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू केली. त्यावेळी केंद्र सरकारने जारी केलेल्या घोषणेनुसार येत्या १ जुलै २०२२ रोजी पासून या जीएसटी कराच्या बदल्यात राज्यांना मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम केंद्र सरकारकडून बंद करण्यात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्राला मिळणारी महिन्याकाठची …

Read More »