Breaking News

व्हॉट्सअॅपमध्ये आले नवे फिचर, ग्रुप सदस्य वाढविता येणार दुपटीने या गोष्टींचा समावेश नव्या फिचरमध्ये

फेसबुकने व्हॉट्सअॅप विकत घेतल्यापासून त्यामध्ये नवनव्या फिचरची भर टाकत ते अधिकाधिक लोकपयोगी बनविण्याचा प्रयत्न मेटा कंपनीकडून करण्यात येत आहे. मागील काही काळात एका ग्रुपवरील सदस्यांना एकाचवेळी ग्रुप कॉल करता येण्याचे फिचर अॅड केल्यानंतर व्हॉट्सअॅपद्वारे पैसे पाठविण्याची सुविधाही सुरु कऱण्यात आली. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपच्या ग्रुप मधील सदस्यांची संख्या दुपटीने वाढविता येण्याची सुविधा व्हॉट्सअॅपने उपलब्ध करून दिल्याने आता ग्रुपमध्ये ५१२ पर्यंत सदस्य वाढविता येणार आहे.

नवीन अपडेटमध्ये ५१२ समस्यांना जोडण्याची अनुमती असेल. सध्या ही मर्यादा २५६ सदस्यांपर्यंत कार्यरत आहे. डब्लूएबीटाइन्फोच्या अहवालानुसार, मेटा मालकीने हे वैशिष्ट्य व्हॉट्सअॅपच्या अँड्रॉइड, आयओएस आणि डेक्सटॉप आधारित ॲप्सच्या बीटा आवृत्तीवर आणले आहे. एका ग्रुपमध्ये ५१२ पर्यंत सदस्य जोडण्याची क्षमता हे एकमेव अपडेट नाही तर अलीकडच्या काळात त्यांच्या प्लॅटफॉर्मवर अनेक अपडेट आणली आहेत. कंपनीने मेसेज रिएक्शन आणि

एकावेळी २ जीबी पर्यंत फाइल शेअर करण्याची क्षमता यासारखी वैशिष्ट्ये देखील आणली आहेत. यापूर्वी, व्हॉट्सअॅप वापरकर्ते फक्त १०० एमबी पर्यंत फाइल्स शेअर करू शकत होते.

फिचर कसे तपासाल, त्यासाठी या गोष्टी करा

१)जर तुम्हाला ५१२ पर्यंत सदस्य जोडू शकण्याची , कार्यक्षमता प्राप्त झाली आहे का हे तपासायचे असल्यास , नवीन गट पर्यायावर टॅप करून नवीन गट तयार करण्याचा प्रयत्न करा.

२)खालील स्क्रीन तुम्हाला तुमच्या सर्व व्हॉट्सअॅप सदस्यांची यादी दाखवेल ज्यांना ग्रुपमध्ये ॲड करता येईल.

३) हीच स्क्रीन तुम्हाला ग्रुपमध्ये जोडल्या जाऊ शकणार्‍या सहभागींची एकूण संख्या देखील दाखवेल.

४)यासाठी आयओएसवर व्हॉट्सअॅप अपडेट करण्यासाठी, ॲपवर जा, व्हॉट्सअॅप टाइप करा आणि अपडेट ऑप्शनवर दाबा.

५) तुम्ही अँड्रॉइड फोनसाठीही अशीच युक्ती वापरू शकता.

६) व्हॉट्सअॅप डेस्कटॉपवर ॲपचे न्यू व्हर्जन मिळविण्यासाठी, मायक्रोसॉफ्ट स्टोअरवर जा, व्हॉट्सअॅप टाईप करा आणि नंतर अपडेट बटण दाबा.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *