Breaking News

संजय राऊत म्हणाले, “त्या” वक्तव्यावरून भाजपा आखाती देशांकडे माफी मागतेय नुपूर शर्मा, नवीन कुमार जिंदाल यांची हकालपट्टी केल्यानंतर राऊतांची टीका

भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल अवमानकारक टीप्पणी केल्यानंतर आखाती प्रदेशातील भारताबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत भारतीय मालावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे अखेर भाजपाने नूपुर शर्मा यांना भाजपामधून सहा वर्षासाठी निलंबित केले. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की, हे प्रकरण आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे.

वाचा

अनेक आखाती देशांनी भारतीय राजदूतांना बोलवून नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल जे वक्तव्य केले आहे त्याचे समर्थन या देशात कोणीही करणार नाही. भाजपाला या प्रकरणी देशासह संपूर्ण आखाती देशांकडे माफी मागावी लागत आहे. संजय राऊत हे अयोध्येत पत्रकार परिषदेत बोलत होते.

एका वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी प्रकरणावरील वादचर्चेत भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याचा आरोप आहे. दिल्ली भाजपाचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांनीही प्रेषितांबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्याचा आरोप असून, पक्षाने त्यांची हकालपट्टी केली. शर्मा यांना पक्षाने निलंबित केले आहे.

वाचा

दहशतवादी भरदिवसा काश्मिरी पंडितांची हत्या करत आहेत ही छोटी घटना आहे का? भाजपा त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यांशी सहमत आहे का हे सांगून टाकावे. काश्मिरी पंडितांची मदत करु असे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. हे कोणी भाजपाच्या नेत्याने म्हटले असते तर आम्हाला आनंद झाला असता. पण काश्मिरच्या बाबतीत फक्त राजकारण करणे त्यांच्या रक्तात आहे. तीन महिन्यात २७ काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. तर १७ मुस्लिम पोलीस अधिकाऱ्यांची हत्या झाली आहे. भाजपाची भाषा ही राष्ट्रीय एकात्मतेची नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान काँग्रेस नेते सचिन सावंत यांनीही ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. फारच उशीर झालेली जाणीव जितकी जास्त काळ टिकेल तितके देशाचे भले होईल. भाजपा नेत्यांकडून इतर धर्म व पंथांविरुध्द टोमणे, खोडसाळपणा, धोरणे, कृती सर्रास झाल्या आहेत. नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्यावर कारवाई पुरेशी नाही. पंतप्रधान, गृहमंत्री व आदित्यनाथांपासून सुरू होणारी मोठी यादी आहे, असे सचिन सावंत म्हणाले.

इस्लामिक देशांनी काही पावले उचलल्यानंतर भाजपाने उचललेले पाऊल प्रामाणिक व मनापासून आहे असे म्हणता येणार नाही. देशाचे सर्वोत्तम हित हे सर्व समुदायांमधील शांतता आणि सौहार्दात आहे. हा गांधीजींचा भारत आहे आणि ते म्हणतात की मोदी सरकारने भारताला लाज वाटेल असे केले नाही असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

हे ही वाचा

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *