Breaking News

तरूणांच्या आंदोलनासमोर केंद्राची थोडीशी माघार; अग्निपथ योजनेत आता या सवलती देशातील तरूणांकडून माघार नाहीच

लष्कराच्या तिन्ही दलातील भरतीसाठी केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अग्निपथ योजनेला तरूणांचा वाढता विरोध काही केल्या कमी होण्यास तयार नाही. मागील तीन दिवसांपासून उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये आणि दक्षिण भारतातील काही राज्यांमधील तरूणांकडून या योजनेच्या विरोधात रेल्वे स्टेशन्सवर दगडफेक, जाळपोळीच्या घटना आदी घडताना दिसत आहे. त्यातच आज काही राज्यांमध्ये या तरूणांकडून बंदची हाक दिली. यापार्श्वभूमीवर अग्निपथ योजनेत आणखी काही नव्या सवलतींचा समावेश करण्यात आला आहे.

तरूणांच्या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर काल केंद्र सरकारने अग्निपथ योजनेत भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूणांच्या वयाच्या अटीत शिथीलता आणत आता २३ वयापर्यतच्या  तरूणांना भरती होण्यास सवलत देण्यात आली. त्यानंतर आज अग्निपथ योजनेत भरती झालेल्या तरूणांसाठी त्यांचा चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कोस्ट गार्ड आणि राज्य सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या विविध संरक्षण विभागात १० टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे.

या आहेत अग्निवीरांसाठी सवलती

याशिवाय केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सेंट्रल आर्मड फोर्सेस किंवा सीएजीएफ आणि आसाम रायफल मध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाकडून १० टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे.

तसेच सीएजीएफ आणि आसाम रायफलमध्ये भरती होऊ इच्छिणाऱ्या तरूणांना तीन वर्षे वयात शिथिलता मिळणार आहे.

त्याचबरोबर भारतीय नौदलाच्या मर्चंट नेव्ही मध्ये शिपिंग कार्पोरेशनच्या सहा विभागातही नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

तसेच अग्निपथ योजनेतंर्गत भरती झालेल्या तरूणांना पुढील शिक्षण सुरु ठेवण्यासाठी विविध नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ ओपन स्कुलकडून १२ वीची परिक्षा देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *