Breaking News

बीएसएनएलची ४ जीची तयारी, मग मोदींनी ५ जीचा शुमारंभ नेमका कोणासाठी? खाजगी कंपन्यासाठी तर नाही ना?

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या भारत संचार निगम लिमिटेड कंपनीच्या लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस घ्यायला लावून काही तात्पुरत्या लोकांच्या मनुष्यबळावर सध्या ही कंपनी चालविण्यात येत आहे. त्यातच बीएसएनएलकडून ५ जी सेवा पुढील वर्षी १५ रोजीपासून देशभरात जाहीर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. मग जवळपास ८ ते ९ महिने आधीच ५ जी सेवेचा शुमारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी का आणि कोणासाठी केला? असा सवाल बीएसएनएल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

देशातील रिलायन्स, एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीकडून ५ जीची सेवा पुरविण्याची तयारी सुरु केलेली आहे. तसेच ही सेवा सुरु करण्यासाठी तारीखही जाहीर करण्यासाठी या कंपन्यांकडून तयारीही सुरु झाली आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लि. कंपनी आता ४ जी लाँच करण्याच्या तयारीत असल्याचे माहिती पुढे आली. भारत संचार निगम लि. या कंपनीतून आधीच लाखो कर्मचाऱ्यांना व्हीआरएस देऊन मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्यात आली आहे. तर दुसऱ्याबाजूला देशातील खाजगी कंपन्यांकडून ५ जी सेवा पुरविण्याची तयारी करण्यात येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ जी ची सेवेचा शुमारंभही करण्यात आला. मात्र हीच सेवा बीएसएनएलकडून सुरु होण्यासाठी पुढील वर्षीच्या स्वातंत्रय दिन निश्चित करण्यात आला आहे. त्यामुळे आता इतक्या झटपट ५ जीचा शुमारंभ का करण्यात आला? याचे उत्तर मिळत नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यापूर्वी माहिती व प्रसारण मंत्री आणि आयटी मंत्री प्रमोद महाजन असतानाही बीएसएनएलकडून २ जीची सेवा सुरु करण्यात येणार होती. त्याची तयारीही झाली होती. तशीच त्याची तारीखही जवळपास निश्चित करण्यात आली होती. मात्र त्यावेळी रिलायन्स कंपनीचा १ रूपयातील मोबाईल आणि त्यांच्याकडून २ जी सेवेचा शुमारंभ करण्यात येणार होता. त्यावेळी बीएसएनएलची नियोजित होणारी २ जी सेवेचा शुमारंभ पुढे ढकलण्यात आला. आणि ३जी सेवा बाजारात आल्यानंतर बीएसएनएलकडून २ जी सेवा लाँच करण्यात आली. अगदी त्याच धर्तीवर आता ५ जी सेवेच्या बाबत करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले.

बीएसएनएल ही कंपनी केंद्र सरकारचीच एक अंगिकृत कंपनी आहे. तरीही या कंपनीला केंद्र सरकारकडूनच दुय्यम पध्दतीची वागणूक मिळत आहे. या अशा भूमिकेमुळेच आज बीएसएनएलची ही अवस्था झाली आहे. देशात एक नंबरची असलेली यंत्रणा असूनही आज सर्वात कमी मोबाईल सेवेचा लाभ घेणारे आणि उपभोक्ते फक्त बीएसएनएलचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

जर बीएसएनएलची सेवा सर्वात आधी सुरु झाली असती तर बीएसएनएलची आर्थिक उलाढाल वाढली असती, भारत संचार निगम स्वंयपूर्ण होण्यासाठी मदतच झाली असती. याशिवाय आतापर्यत आर्थिक गर्तेत अडकलेल्या या कंपनीला बाहेर पडण्याचा एक आर्थिक मार्ग सापडला असता. पण एकाबाजूला सरकारी कंपन्या नीट चालत नाही असे जगजाहीर वक्तव्य करायचे आणि दुसऱ्याबाजूला सरकारी कंपन्या कशा गाळात जातील यासारखी धोरणे अंगीकराली जाणार असतील तर सरकारी कंपन्या कधीच तोट्यातून बाहेर येणार नसल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *