Breaking News

पॅनकार्ड क्लब कंपनीत पैसे अडकलेल्यांसाठी खुशखबर: पैसे कसे परत मिळवायचे, वाचा राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने दिला पैसे परत देण्याचा निकाल

गुंतवणूकदारांनी पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत गुंतवणूक केली. मात्र आता ही कंपनी दिवाळखोरीत काढण्यात आल्याने अनेक गुंतवणूकदारांना आपले पैसे कसे मिळणार याबाबतची चिंता सतावत होती. अखेर याप्रकरणी राष्ट्रीय कंपनी कायदा ट्रिब्युनलने घेतलेल्या सुनावणीत सदर कंपनीने गुंतवणूकदारांचे पैसे परत देण्याचे आदेश ९ सप्टेंबर २०२२ रोजी दिले होते. सदरचे पैसे परत मिळविण्यासाठी गुंतवणूकदारांनी खालील गोष्टी कराव्यात

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण कोर्टाने गुंतवणूकदारांना परतावा मिळावा यासाठी निराकरण प्रक्रियाची नेमणूक केली आहे. आता पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या सभासदांना परतावा मिळावा यासाठी आवश्यक प्रोसेस करण्यास सांगितले गेले आहे.

यामुळे आज आपण कंपनीच्या गुंतवणूकदारांना परतावा मिळविण्यासाठी नेमकी कशी प्रोसेस करावी लागेल याविषयी माहिती घेऊन हजर झालो आहोत. पॅन कार्ड क्लब च्या सर्व सभासदांनी गुंतवणूक व आपली केवायसी कागदपत्रे जमा करून खालील प्रमाणे प्रोसेस करावी.

आधार कार्ड, पॅनकार्ड, कॅन्सल चेक किंवा बँक पासबुक, पॉलिसी मॅच्युरीटी डेट पासून ६ महिन्याचे बँक स्टेटमेंट्स. मेंम्बरशीप सर्टिफिकेटस (Membership Certificates),  ACK रीसीट/मेंम्बरशीप पावती(Acknowledgement of receipt).

पॅन कार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांना आपला परतावा मिळविण्यासाठी http://pclcirp.dcirrus.co या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. पोर्टलला भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि कॅप्टचा कोड भरावा लागणार आहे. यानंतर Next बटनावर क्लिक करून मोबाईल वर आलेला ओटीपी भरावा लागणार आहे. ओटीपी व्हेरिफाय झाल्यानंतर एक अर्ज गुंतवणूकदारांना भरावा लागणार आहे. हा अर्ज परतावा मिळविण्यासाठी क्लेम अर्ज राहणार आहे.

या अर्जात किंवा ऑनलाईन क्लेम फॉर्ममध्ये सर्वप्रथम ओळख पुरावा निवडावा लागणार आहे. यामध्ये पॅन कार्ड, आधार कार्ड पासपोर्ट वोटिंग कार्ड त्यापैकी एक निवडावे लागणार आहे. नंतर जो ओळख पुरावा निवडला असेल त्याचा क्रमांक नमूद करावा लागणार. ओळखीचा पुरावा अपलोड करावा लागेल. हा पुरावा pdf, jpg, jpeg, png या फाईलमध्ये असणे आवश्यक राहणार आहे. यासोबतच गुंतवणूकदारांना प्रिन्सिपल रक्कम, एकूण क्लेम रक्कम, पॉलिसी केव्हा संपणार आहे त्याची दिनांक, सरेंडर मूल्य या गोष्टी दिलेल्या रकान्यात प्रविष्ट कराव्या लागणार आहेत.

एका गोष्टीची काळजी घ्या, ती म्हणजे नवीन क्लेम अर्ज करताना Folio Number या पर्यायात जो की मेंबरशिप सर्टिफिकेट वरती असतो तो फोलिओ नंबर टाकायचा आहे. यानंतर, Form CA भरायचा आहे. यामध्ये दावा करणाऱ्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता व्यवस्थितरित्या प्रविष्ट करा. यांनतर Relevant Particulars हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये काही रकाने आधीच भरलेले असतील. जे रकाने खाली आहेत त्यामध्ये कर्ज सादर केले जाऊ शकते अशा तपशिलांचा उल्लेख नमुद करायचा आहे. debt केव्हा लागले आणि कसे लागले हे देखील या ठिकाणी नमूद करायचे आहे.

यानंतर क्लेम (Claim) फॉर्म गुंतवणूकदारांना भरावा लागेल. यामध्ये दाव्याच्या विरुद्ध परस्पर देय असेल तर ते नमूद करा. सुरक्षा ठेवलेली असल्यास सुरक्षा नमूद करा. बँका खात्याचा सविस्तर तपशील भरा. तसेच या दाव्यासोबत जोडलेल्या कागदपत्रांची देखील या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. त्यानंतर ड्रॉपडाऊन मधून कोणतीही अधिकृत व्यक्ती निवडावी लागणार आहे. यानंतर नाव रिलेशन पत्ता नमूद करा. तुम्ही स्वतः भरत असाल तर रिलेशन सेल्फ नमूद करा. इतर देखिल रिलेशन नमूद केले जाऊ शकते.

यानंतर फॉर्मची प्रिंट आउट घ्या. प्रिंट आउट घेतल्यानंतर घोषणापत्र भरा. घोषणापत्र भरल्यानंतर स्वाक्षरी करा. पडताळणी मध्ये, फॉर्मची प्रिंट आउट घेतल्यानंतर दावा दाखल करण्याचे ठिकाण आणि तारीख नमूद करा. आता पुन्हा एकदा साइन इन करा. फॉर्मवर स्वाक्षरी झाल्यानंतर फॉर्म स्कॅन करुन अपलोड करा. यानंतर स्वाक्षरी केलेला फॉर्म, बँक स्टेटमेंट. सदस्यता प्रमाणपत्र अपलोड करा. स्वारस्य पुरावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे असल्यास अपलोड करा. यानंतर अपलोड अँड सबमिट क्लेम (Upload And Submit Claim) यावर क्लिक करा. आता तुमचा दावा सबमिट केला जाईल. यानंतर तुम्हाला एक ई-मेल येईल ज्यामध्ये तुम्ही दावा सक्सेसफुली सबमिट केला आहे असे नमूद असेल आणि दावा क्रमांक देखील मिळणार आहे.

दिवाळखोरी न्यायालयाने पॅनकार्ड क्लबना दिवाळखोरी ठराव प्रक्रियेत प्रवेश दिला. सुमारे १०० भागधारकांनी दाखल केलेल्या संयुक्त याचिकेच्या आधारे एका दिवाळखोर न्यायालयाने Pancard Clubs Ltd ला कॉर्पोरेट दिवाळखोरी रिझोल्यूशन प्रक्रियेत (CIRP) प्रवेश दिला आणि राजेश सुरेशचंद्र शेठ यांची अंतरिम रिझोल्यूशन प्रोफेशनल (IRP) म्हणून नियुक्ती केली.

न्यायालयाच्या निकालाची प्रत:

Check Also

एलआयसीने अदानी कंपनीत गुंतवणूकीचे मुल्य वाढले ५९ टक्क्याने मूल्य वाढल्याचे उपल्बध आकडेवारीवरून दिसते

एलआयसीने २०२३-२४ या आर्थिक वर्षात अदानी समूहाच्या कंपन्यांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या मूल्यात ५९ टक्क्यांनी वाढ झाली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *