Breaking News

चर्चेपासून पळ काढण्यापेक्षा दोन आठवड्यांचे अधिवेशन घ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील शेतकऱ्यांचे, अनेक समाजाच्या समस्या, मराठा समाजाच्या समस्यांवर चर्चा होणे आवश्यक असताना सरकार केवळ दोन दिवसाचे अधिवेशन घेवून अधिवेशनातील चर्चेपासून पळ काढत असल्याची टीका करत दोन दिवसाचे अधिवेशन घेण्याऐवजी दोन आठवड्यांचे घ्या अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक झाल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
राज्य सरकारने अधिवेशन पुढे ढकललं असून फक्त दोन दिवस अधिवेशन घेण्यात येत आहे. शेतकरी संकटात आहे शेती नष्ट झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत, अनेक समाजाच्या समस्या आहेत, मराठा समाजच्या समस्या असून याप्रश्नांवर चर्चा झाली पाहिजे असे ते म्हणाले.
राज्य सरकारला न्यायालायच्या चपराक बसत असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, सरकारच धोरण निश्चित झालं पाहिजे होत. या सर्वांवर चर्चा करण्यासाठी किमान दोन आठवडा अधिवेशन झालं पाहिजे. दोन दिवसांच अधिवेशन घेणं म्हणजे चर्चे पासून पळ काढला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
आमचा विरोध दर्शवला आहे. सर्व तुम्ही उघड करत आहेत आणि अधिवेशन वरती बंधन का घालत आहात
नागपूर मध्ये बजेट सेशन घेतलं पाहिजे अशी आम्ही मागणी केल्याचेही त्यांनी केली.

Check Also

कोलकाता पोलिसांनी मागितले राजभवनाचे सीसीटीव्ही फुटेज

कोलकाता पोलिसांच्या चौकशी पथकाने एका महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छेडछाडीच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी राज्यपाल सी.व्ही. आनंदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *