Breaking News

१४-१५ सप्टेंबर रोजी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता नवरात्रीत निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळीत सरकार स्थापन होणार

मुंबईः प्रतिनिधी
राज्यातील निवडणूकीला अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक राहीला असून जनतेला खुष करण्यासाठी विद्यमान राज्य सरकारला आणखी १५ दिवसांचा कालावधी मिळणार आहे. पुढील सप्टेंबर आणि ऑक्टोंबर महिने हे सणासुदीचे महिने असल्याने ऐन नवरात्रीत राज्य विधानसभेच्या निवडणूकीची रणधुमाळी तर दिवाळी नव्या स्थानापन्न होणाऱ्या सरकारला जनतेसोबत साजरी करायला मिळणार आहे.
विद्यमान १३ व्या विधानसभेची मुदत १८ ऑक्टोंबर २०१९ रोजी संपत आहे. तत्पूर्वी १४ वी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने सर्व माहीती मागविली असून पाठविलेल्या माहितीनुसार पुढील महिन्याच्या १४ किंवा १५ सप्टेंबर २०१९ रोजी अर्थात गणपती विसर्जनानंतर विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू होणार आहे. त्यानंतर पुढील सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस विधानसभा निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागविणे, मागे घेणे, अर्जाची छाननी आणि त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी आदी गोष्टींना मुबलक वेळ मिळणार असल्याची माहिती निवडणूक आयोगातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
गतवेळी २०१४ साली १३ वी विधानसभा ८ ऑक्टोंबर २०१४ रोजी संपत होती. त्यावेळीही सप्टेंबर महिन्यातच निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द झाली होती. त्यावेळी राज्यातील २८८ विधानसभांसाठी एकाच दिवशी मतदान घेण्यात आले होते. मात्र यंदा यात बदल होवून दोन टप्प्यात मतदान घेण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसला तरी तशी शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
नव्या विधानसभेसाठी १४ किंवा १५ सप्टेंबर रोजी जाहीर होणार असल्याचे निश्चित झालेले आहे. त्यामुळे नवरात्रीच्या सणात राजकिय रणधुमाळी तर नवे सरकार दिवाळीत स्थानापन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *