Breaking News

सांस्कृतिक संचालनालयाच्या निमंत्रण पत्रिकेवर “संचालक” चेच नाव गायब प्रभारी संचालकाने स्वतःचा उल्लेख संचालक असा केल्याने सांस्कृतिक कार्य मंत्री कार्यालयाचा बडगा

मुंबई: प्रतिनिधी
यापुढे सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या प्रभारी संचालक यांनी कार्यक्रमांच्या निमंत्रण पत्रिकेवर आपल्या नावाचा आणि पदाचा नामोल्लेख करू नये.अशा स्पष्ट सूचना सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या कार्यालयातून दिल्याचे विश्वासनिय सूत्रांनी दिली.
श्रीमती स्वाती काळे ह्या ११जुलै २०१९ रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या संचालक पदावरून कार्यमुक्त झाल्यानंतर संचालक पदाचा कार्यभार सध्याच्या सह संचालक यांच्याकडे प्रभारी स्वरूपात सोपविण्यात आला. त्यामुळे विद्यमान सह संचालक ह्या आपल्या संपूर्ण नावासहित “प्रभारी संचालक” असा नामोल्लेख प्रत्येक कार्यक्रम पत्रिकेवर करीत होत्या.
परंतु १ आँगस्ट २०१९ रोजी लोकशाहिर अण्णाभाऊ साठे जयंती दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रम पत्रिकेवर त्यांनी “प्र. संचालक” तर दुसऱ्या २ आँगस्ट २०१९ रोजी संगीतकार नौशाद अली जन्मशताब्दीच्या कार्यक्रम पत्रिकेवर केवळ प्रभारी पदाचा नामोल्लेख टाळत “संचालक” असा पदाचा नामोल्लेख केला. नामोल्लेख प्रकरणाची सांस्कृतिक कार्य खात्यात जोरदार चर्चा रंगली होती. या चर्चेची गंभीर दखल त्यानंतर सांस्कृतिक मंत्री कार्यालयाने घेतल्याची माहिती सांस्कृतिक विभागाच्या मंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितली.
त्यामुळे शुक्रवारी ३० आँगस्ट २०१९ रोजी सायंकाळी रविंद्र नाट्य मंदिर येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या कार्यक्रम पत्रिकेवरून संचालक किंवा प्र. संचालकांच्या नावाचा नामोल्लेख टाळत विनीत म्हणून केवळ सांस्कृतिक कार्य खात्याचे प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.
आतापर्यत सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा कोणताही कार्यक्रम असला तर “पूर्ण वेळ संचालक असो..किंवा प्रभारी संचालक”..! यांच्या नावाचा उल्लेख निमंत्रण पत्रिकेवर नावासह पदाचा नामोल्लेख केला जाण्याची प्रथा होती. मात्र ही प्रथा पहिल्यादाच मोडीत निघाल्याने मंत्रालयात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *