Breaking News

युध्दनौका आयएनएस विक्रांतच्या नावावर गोळा केलेला कोट्यावधीचा निधी गेला कुठे? शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांचा किरीट सोमय्याला सवाल

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या विरोधात मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट्स अफेरसने भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीवरून आज गुन्हा दाखल केल्यानंतर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी सोमय्यांवर एक खळबळजनक आरोप केला असून युध्दनौका आयएनएस विक्रांत जेव्हा मोडीत काढण्याचा निर्णय केंद्रीय संरक्षण विभागाने घेतला. त्यानंतर या युध्दनौकेला भंगारात काढू नये यासाठी किरीट सोमय्या यांनी लोकांकडून निधी गोळा केला. तो निधी गेला कुठे असा सवाल करत तो पैसा मुलाच्या कंन्स्ट्रक्शन कंपनीत आणि स्वतःच्या निवडणूकीत वापरल्याचा गंभीर आरोप केला.
नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आज सकाळी सोमय्यांने संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची कॉपी ट्विट केली.
किरीट सोमय्या विक्रांत वाचवा असे टी शर्ट घालून फिरत असताना लाखो, करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. याशिवाय अनेक कंपन्यांकडून त्यांनी विक्रांत वाचवण्याच्या नावाखाली कोट्यवधी गोळा केले. ही रक्कम ५७ ते ५८ कोटी होती अशी माहिती त्यांच्या एका जवळच्या व्यक्तीने दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.
महात्मा किरीट सोमय्या यांच्या मुलाखती मी वाचल्या. यावर त्यांनी या सरकारला देशभक्ती नाही असे म्हटले होते. २०० कोटी गोळा करणार असून ते राजभवनात जमा करु असे त्यांनी सांगितले होते. माझ्याकडे राज्यपाल कार्यालयातून आलेले पत्र आहे. आरटीआय कार्यकर्त्याने राज्यपालांना २०१३, २०१४, २०१५ विक्रांतसाठी जे पैसे गोळा केले होते ते जमा झालेत का? अशी विचारणा केली. यावर राज्यपाल कार्यालयाने असे कोणतेही पैसे जमा करण्यात आलेले नाहीत असे उत्तर देण्यात आले. देशाच्या सुरक्षेशी, राष्ट्रीय भानवेशी केलेली ही फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे असा आरोप करत देशद्रोही किरीट सोमय्यांनी ५७ कोटी जमा केले. पण हा आकडा १०० कोटींच्या वर असावा अशी शंकाही व्यक्त करत आता आपल्याला तर काही समजलं नाही असं ते म्हणतील सांगत संजय राऊतांनी सोमय्यांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखविले.
आम्ही चर्चगेट स्टेशनला त्या डब्यात ५ हजार टाकल्याचे मला अनेकांनी सांगितलं आहे. ही रक्कम कुठे गेली? कोणाच्या घशात गेली? ही रक्कम भाजपाने निवडणुकीत वापरली की किरीट सोमय्यांची कंस्ट्रक्शन कंपनीत वापरले? असा सवालही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली गोळा केलेले पैसे कोणाच्या खिशात गेले याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी चौकशी केलीच पाहिजे अशी भूमिका मांडत पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर सीबीआय, इन्कम टॅक्स आणि भाजपाची पदाधिकारी असणारी ईडी यांनी चौकशी करावी. त्यांना काही सापडत नसेल तर मी मदत करेन असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. तसेच यात अनेक लोक आहेत पण सोमय्या या भ्रष्टाचाराच्या कटाचे सूत्रधार असल्याचा आरोप त्यांनी केला.

संजय राऊतांची पत्रकार परिषद संपल्यानंतर किरीट सोमय्या यांनी यावर प्रत्युतर दिले. यानंतर काही वेळाने पुन्हा एकदा संजय राऊत पत्रकार परिषदेसाठी आले. राज्यपाल भाजपाचेच आहेत, आमचे शाखाप्रमुख तिथे बसलेले नाहीत. भाजपाचे आधारस्तंभ असणाऱ्या राज्यपालांच्या कार्यालयाने जर पैसे जमा झाले नसल्याचे सांगण्यात येत असेल तर यापेक्षा वेगळा पुरावा असेल तर या माणसाने डोकं, मेंदू तपासून घ्यावा. तुम्ही दाखवता ते पुरावे आम्ही दाखवतो ते काय शेंगदाण्याचे कागद आहे का? अशी खोचक विचारणा त्यांनी केली.
संजय राऊतांचा हा नवीन पराक्रम असल्याचे किरीट सोमय्यांनी म्हटले असता संजय राऊतांनी येड** असा आक्षेपार्ह शब्द वापरला. “येड** आहे तो, हे मी ऑन रेकॉर्ड बोलतोय. महाराष्ट्रात अशा चु** लोकांना स्थान नाही. महाराष्ट्राला लागलेली ही कीड असून ही कीड संजय राऊत, शिवसेना संपवणार. हा चु** पराक्रम काय सांगतो मला अशी संतप्त प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.
हे सगळे महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आयएनएस विक्रांतच्या नावाखाली कोट्यवधी जमा करतात आणि भ्रष्टाचार बाहेर काढल्यानंतर पराक्रम म्हणता. हा देशद्रोह आहे. देशभावनाच्या भावनेशी खेळण्याचा प्रकार भाजपाने केला असून सोमय्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून अटक झाली पाहिजे अशी मागणी केली.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *