Breaking News

ट्विट करत रोहित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला, राजकारणापायी…. निधी वाटपावरून साधला निशाणा

राज्यात शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस मधील अजित पवार गटानेही भाजपाच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार अजित पवार हे सत्तेत सहभागीही झाले. मात्र अजित पवार हे जरी राज्याचे गृहमंत्री असले तरी त्यांना पूर्ण अधिकार अद्यापही दिले नसल्याचे आता स्पष्ट होत आहे. याच मुद्यावरून शरद पवार समर्थक रोहित पाटील यांनी अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला असून निधी वाटपाच्या राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नये असा सांगत आपल्या सारख्या मोठ्या व्यक्तीला सांगण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव काय असा उपरोधिक टोला लगावला.

वास्तविक पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथही घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी आढावा बैठकांचा सपाटा लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारित येत असलेल्या विभागांच्या बैठकाही घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर कोणतीही फाईल मुख्यमंत्र्यांकडून खाली येण्याऐवजी ती पहिल्यांदा अर्थखात्याकडे त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे असा प्रवासही निश्चित केला.

मात्र सरकारच्या घटक पक्षाच्या आमदारांना विविध विकास कामांसाठी भरघोस निधी दिला. मात्र विरोधी बाकावरील आमदारांना निधी देण्याबाबत अजित पवार यांनी हात आखडता घेतला. त्याचा फटका अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्या मतदारसंघातील विकास कामांनाही बसला.

यावरून रोहित पवार यांनी आज दुपारी ट्विट करत म्हणाले की, माझ्या कर्जत आणि जमखेड मतदारसंघातील दोन्ही शासकिय रूग्णालयांचे काम निधी अभावी अर्धवट राहिले आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे आहेत. मात्र या रूग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही अशा सूचना देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिल्यात. समकक्ष असलेल्या अजित पवार यांच्या खात्यावर हा अंकुश ठेवण्याचाच प्रकार असून तो योग्य वाटत नाही….आणि दुसरं म्हणजे उपचारा अभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का? असा सवाल केला.

तसेच रोहित पवार पुढे लिहितात, राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतोय…पण हे विचारांच आणि तत्वांचं असावं…राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जावू नये हे आपल्या सारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय असा खोचक टोलाही लगावला.

रोहित पवार म्हणाले, शेअर केलेले फोटो बघितले तर जर इतकं काम होऊनही १ रूपयाही निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांचीही असल्याची आठवणही करून दिली.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *