Breaking News

मोदी सरकारचा फतवाः अधिकाऱ्यांनो रथयात्रा काढा, काँग्रेसची टीका सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सरकारच्या कामाचा प्रचार करण्याचे निर्देश

आगामी पाच राज्यातील विधानसभा निवडणूकांचे वेळापत्रक जाहिर झाले आहे. त्यानुसार निवडणूक प्रक्रियाही सुरु झाली आहे. देशभरातील प्रमुख राजकिय पक्ष निवडणूकीच्या प्रचाराला लागले आहेत. मात्र नेहमीप्रमाणे मोदी सरकारमधील बहुसंख्य खासदार, मंत्री आणि विविध राज्याचे मुख्यमंत्री यासह स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ही प्रचाराच्या कामात व्यस्त राहणार आहेत. त्यामुळे केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या उपसचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांवर मोदी सरकारच्या कामाचा प्रचार करण्यासाठी विभागीय रथयात्रा काढण्याचे आदेश स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याची माहिती पुढे आली आहे. या आदेशावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी टीका करत लोकशाहीत अशा गोष्टी होत नाहीत याची आठवण करून दिली.

आगामी राज्य विधानसभेच्या निवडणूकांपाठोपाठ देशभरात काही महिन्याच्या अवधीनंतर लगेच लोकसभेच्या निवडणूका होत आहेत. मात्र मागील नऊ वर्षाच्या कालावधीत मोदी सरकारने काय कामे केली यापेक्षा बहुमताच्या जोरावर नको असलेली कामे पुढे रेटण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात लोकांमध्ये वाढती नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञान (आयटी), भारतीय लष्कर (आर्मी), आयएएस अधिकारी, आयपीएस अधिकाऱी यांच्यावर विभागनिहाय रथ यात्रा काढून मोदी सरकारच्या कामाचा प्रचार करण्याचे निर्देश दिले.

यावर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी टीका करताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सतत त्यांच्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त असतात. त्यामुळे सरकारने केलेल्या कामाचा प्रचार करण्यास त्यांच्याकडे वेळ नसतो. तसेच देशात जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती होत असते त्यावेळी ते अशा पध्दतीने सरकारी कर्मचाऱ्यांचा गैरवापर करत असतात. आज काढण्यात आलेली नोटीफिकेशन ही सुध्दा त्याचाच भाग असल्याचे म्हणाले.

तसेच मल्लिकार्जून खर्गे पुढे म्हणाले की, लोकशाही प्रणालीमध्ये शासकिय कर्मचाऱ्यांना अशा पध्दतीने पक्षाच्या प्रचारासाठी वापरता येत नाही. तसेच त्यांना विशिष्ट नावाने बोलविता येत नाही. यापूर्वीही मोदी सरकारने माहिती व जनसंपर्क विभागासह अन्य विभागाचा स्वतःच्या पक्षाच्या प्रचारासाठी वापर केला. आता इतर विभागातील उपसचिव आणि सहसचिव दर्जाच्या अधिकाऱांचा गैरवापर करत आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही पत्र पाठवित अशा गोष्टी रोखण्याचे आवाहन केल्याचे सांगितले.

तर दरम्यान भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही ट्विट करत मल्लिकार्जून खर्गे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हणाले की, कदाचीत काँग्रेसची संकल्पना वेगळी असेल. पण सरकारने केलेल्या कामे लोकांपर्यंत पोहोचविणे सरकारची जबाबदारी आहे. सरकारी योजना सर्वस्तरापर्यंत पोहोचविणे, त्यांच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे यासाठी गोष्टी गरजेच्या आहेत. जर कोणाच्या मानसिकतेत प्रॉब्लेम असेल तर काय असा उपरोधिक सवालही केला.

पुढे ट्विटमध्ये जे पी नड्डा म्हणाले, पण काँग्रेसला गरिबांनी नेहमी गरिबच रहावे असे वाटते. पण त्यांचे विरोधक नेहमी त्या परिस्थितीतून गरिबांना बाहेर काढण्यासाठी सतत प्रयत्न करतात असे टोलाही लगावला.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *