Breaking News

राज ठाकरेंबद्दल शरद पवार म्हणाले, “त्या” रस्त्याने जायचा कार्यक्रम दिसतोय भोंगा विरूध्द हनुमान चालिसावरून शरद पवारांनी व्यक्त केले मत

मागील काही दिवसांमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्यातील राजकारणात जातीय समीकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीकेचा भडीमार केला. त्यास शरद पवार यांनीही मुद्देसुद्द उत्तर देत राज ठाकरे यांचे आरोप परतवून लावले. मात्र आता मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे आणि भाजपाची एकच भूमिका असल्याचे जवळपास स्पष्ट झाल्याने आगामी काळात मनसे भाजपा एकत्र येणार का? याबाबत राजकिय वर्तुळात उत्सुकता असताना याबाबत शरद पवारांना विचारले असता ते म्हणाले की, त्याचं पहिलं भाषण ऐकल्यावर तरी त्यांचं त्या रस्त्याने जायचं त्यांचा कार्यक्रम दिसतोय असे सांगत भाजपाच्या कार्यक्रमानुसार राज ठाकरे यांची वाटचाल होणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगितले.

शरद पवार हे आज जळगांवच्या दौऱ्यावर आहेत. तेथील दोन कार्यक्रमांना उपस्थिती लावल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मनसे त्यांच्या भूमिकेच्या आधारावर आपली जागा निर्माण करू शकेल का? असा प्रश्न विचारला असता आत्तापर्यंत तसं काही झालं नसल्याचे सांगत ते मला सांगता येणार नाही. आत्तापर्यंत तर काही झालं नाही. पण सामाजिक ऐक्य धोक्यात येता कामा नये अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

तुम्ही काहीही भूमिका घेतली तरी आमची भूमिका महत्त्वाची नाही. आमच्याबद्दल लोकांची भूमिका महत्त्वाची आहे. राज ठाकरेंबद्दल लोकांनी गेल्या निवडणुकीत त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचे सांगत मनसेला उपरोधिक टोला लगावला.

दोन दिवसांपासून राज ठाकरेंचा उल्लेख हिंदुजननायक म्हणून करणाऱ्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मनसेला त्यांचं धोरण ठरवण्याचा अधिकार आहे. त्यांची जी भूमिका दिसली, त्यात पहिल्यांदा त्या सभेतलं त्यांचं भाषण ऐकल्यानंतर असं दिसतंय की त्या रस्त्याने जायचा त्यांचा कार्यक्रम दिसतोय. प्रत्येक पक्ष आपला कार्यक्रम ठरवत असतो. त्यांनीही तसा कार्यक्रम ठरवला असेल असेही त्यांनी सांगितले.

याशिवाय सध्या चर्चेत असलेल्या भाजपा-मनसे युतीविषयी माध्यमांनी विचारणा करताच शरद पवारांनी ते शक्य असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगत, मी सांगू शकत नाही. पण दोघांचंही लक्ष सध्या सत्तेत असणाऱ्या संघटनेवर आहे. त्यांना एकत्र यायचं असेल तर ते येऊ शकतात असेही ते यावेळी म्हणाले.

Check Also

नौदलाच्या नव्या झेंड्यावर छत्रपतींच्या राजमुद्रेची छटाः मुख्यंमत्री, उपमुख्यमंत्री म्हणाले… शिवाजी महाराजांना अभिवादन असल्याचे व्यक्त केले मत

संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज …

Leave a Reply

Your email address will not be published.