Breaking News

माजी समेंलनाध्यक्ष सबनीस म्हणाले, मला तर संविधानाचा आवाज पवित्र राजकिय पक्षांच्या भोंगा विरूध्द आरती युध्दाला श्रीपाल सबनीसांचे उत्तर

नुकत्याच झालेल्या गुढी पाडव्याच्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंग्याच्या विरोधात भूमिका घेत जर भोंगे काढले नाहीत तर मस्जिदीसमोर हनुमान चालिसा वाजवू असा इशारा दिला. त्यानंतर भाजपासह सर्वच राजकिय पक्षांकडून ऐनकेन प्रकारे राजकीय कुरघोड्यांचे राजकारण सुरु झाले. यापार्श्वभूमीवर मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी महत्वाचे वक्तव्य केले असून मला तर संविधानाचा आवाज पवित्र असे सांगत मनसेच्या भूमिकेवर टीका केली.
राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. त्याला आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लिम समुदायाकडून रोजा सोडण्यात आला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मनसेने घेतलेल्या भूमिकेवर टीका केली.
भोंग्याच्या आवाजापेक्षा संविधांनाचा आवाज मला पवित्र वाटतो. भोंग्याच्या राजकारणामध्ये देवाला अडकवून नका आणि धर्माला बदनाम करु नका. संविधानाची वाटणी आणि फाळणी करु नका. हे आपल्या देशाला परवडणारे नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. हनुमान जंयतीच्या पूर्वसंध्येला पुण्यातील साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिराच्या विश्वासातामार्फत रोजा इफ्तार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती, गणपतीची मूर्ती, हनुमानाची मूर्ती आणि त्याच्या आतील बाजूस पीर दर्गा आहे. या कार्यक्रमाला मुस्लिम समाजातील नागरिकही सहभागी झाले. या कार्यक्रमाला साहित्यिक श्रीपाल सबनीस उपस्थित होते.
असे एकात्मतेचे कार्यक्रम सतत व्हायला हवेत. गेल्या ३५ वर्षापासून ही परंपरा चालू आहे. भारतातल्या सर्व राजकीय पक्षांनी याचा आदर्श घ्यावा. अशा प्रकारचे प्रयोग राजकीय स्तरावर करावेत. यामुळे राजकारण, धर्मकारण शुद्ध होईल आणि तिरंगा आनंदाने फडकेल अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *