Breaking News

राष्ट्रवादीचा सवाल, नवनीत राणांवर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देतील का? भाजपाकडून राज्यात सातत्याने जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न

मुंबईत याकुब मेमन आणि अमरावतीत कथित लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित करून भाजपा नेत्यांकडून महाराष्ट्र पोलिसांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न झालाच शिवाय जातीय तेढ वाढवण्याचाही प्रयत्न होता असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला.

संबंधित युवतीला डांबून ठेवल्याचा आरोप करत खासदार नवनीत राणा यांनी काल अमरावती पोलिसांशी हुज्जत घातली होती. मात्र त्या युवतीने स्वतः हून रागाच्या भरात घरातून निघून गेल्याचे पोलिसांना दिलेल्या जबाबात स्पष्ट केल्याने या प्रकरणात कुणाला रस होता हे समोर आले आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

दुसरीकडे बुधवारी याकुब मेमनच्या कबरीचा विषय भाजपा आमदार राम कदम यांनी ट्वीट करत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यातही जुना फोटो असल्याचे समोर आले. एकंदरीतच या दोन्ही घटनांमधून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होता का? याचाही तपास करण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली.

सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त करण्यात आला होता तर दुसरीकडे पालघरमध्ये साधूच्या हत्येप्रकरणीही पोलिसांकडे बोट दाखवण्यात आले. मध्यंतरी हनुमान चालिसा म्हणण्याचा हट्ट राणा दांपत्याने करुन पोलिसांना बघून घेण्याची धमकी दिली होती. आता तर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलिसांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे अमरावती पोलिसांना राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नवनीत राणा यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देतील अशी अपेक्षा असल्याची खोचक टोमणाही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मारला.

याकुब मेमन आणि कथित लव्ह जिहादचा विषय आणून राज्यातील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जातीय तेढ निर्माण करणार्‍या अशा नेत्यांवर कारवाई करण्याची गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसदी घेतील का? असा सवालही त्यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा टोला, भाजपाने चावी दिली तेवढेच बोलणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर बोलू नये

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भारतीय जनता पक्षाने दिलेली स्क्रिप्ट वाचण्यापलीकडे काहीही करु शकत नाहीत. काँग्रेसने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *