Breaking News

४ थ्या लॉकडाऊनमध्ये केंद्राने या गोष्टींना नाकारली परवानगी सार्वजनिक ठिकाणे बंदच राहणार केंद्राकडून मार्गदर्शक तत्वे जाहीर

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारबरोबर केंद्र सरकारनेही ४ थ्या लॉकडाऊनची घोषणा संध्याकाळी करत या काळात नेमके चालू राहणार काय बंद राहणार याबाबत स्पष्टता ठेवण्याचा प्रयत्न केला. ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनची सुरुवात उद्या १८ मे पासून ते ३१ मे २०२० पर्यत वाढविण्यात आला आहे.
संध्याकाळी जाहीर केलेल्या पत्रकानुसार बंद राहणाऱ्या गोष्टी
१) देशांतर्गत आणि परदेशी वाहतूक प्रवासी सेवा बंद राहणार. यातून फक्त वैद्यकीय सेवा, अॅम्ब्युलन्स आदींना सुट देण्यात आली आहे.
२) मेट्रो रेल्वे सेवा
३) शाळा, कॉलेज, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, इंन्स्टीट्युट इत्यादी बंद राहणार. फक्त ऑनलाईन शिक्षणाला परवानगी.
४)हॉटेल, रेस्टॉरंट आणि हॉस्पीटॅलीटी सेव या घरगुती कारणासाठी, वैद्यकीय कारणासाठी, अडकलेल्या प्रवाशांसाठी, कामगारांसाठी, विलगीकरण कक्ष, प्रवासी, बस स्थानक-रेल्वे-एअरपोर्टवरील कॅन्टीन, होम डिलीव्हरी फुड आदी गोष्टी चालु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
५) चित्रपटगृहे, शॉपींग मॉल, जीम, स्विमिंग पुल, मनोरंजन पार्क, थिएटर, बारस आणि ऑडिटेरियम, असेंम्बली हॉल आणि यासारखी ठिकाणे, स्पोर्टस कॉम्पेलेक्सही सुरु ठेवण्यास परवानगी नाकारण्यात आली.
६)सर्व राजकिय, सामाजिक, खेळांच्या स्पर्धा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक-धार्मिक,कार्यक्रम करण्यास परवानगी नाहीच.
७) सर्व धार्मिक स्थळे मात्र बंद राहणार.
या गोष्टी फक्त परवानगी करता येतील
१) दोन राज्यातील प्रवाशी-कामगार यांच्या येण्या-जाण्यासाठी वाहने-बसेस दोन्ही राज्यांच्या संमतीने प्रवासास परवानगी. कंटान्मेंट झोन वगळून.
२) राज्यांतर्गत प्रवासाबाबत निर्णय घेण्यास राज्य सरकारांना अधिकार.
३) रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोनबाबत राज्य सरकार निर्णय घेणार.
४)कंटान्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार. तसेच झोनमधून आत-बाहेर जाण्यास बंदी पूर्वीप्रमाणेच राहणार.
५)संध्याकाळी ७ ते सकाळी ७ कर्फ्यु राहणार.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदार संघासाठी ७ मे रोजी मतदान होत असून त्यासाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *