Breaking News

२४ तासातला नवा रेकॉर्ड- २ हजार ३४७ रूग्ण : मुंबई पोहोचली २० हजारावर कोरोनाबाधीत ३३ हजारावर तर ६३ जणांचे मृत्यू

मुंबई: विशेष प्रतिनिधी
राज्यात आता खरोखरच कोरोनाच्या संसर्गाची संसर्गाची साथ सुरु झाल्याचे दिसून येत असून गेले १५ दिवस १ हजारावर आढळून येणारी संख्या आता थेट दुपटीत रूपांतरीत झाली आहे. मागील २४ तासात राज्यात २ हजार ३४७ रूग्णांचे निदान झाले असून एकट्या मुंबई शहरानेही २० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला असून ६३ जणांचा मृत्यू झाला.
राज्यातील रूग्ण संख्या ३३ हजार ५३ वर पोहोचली असून आतापर्यंत ७ हजार ६७७ जण बरे होवू घरी गेलेले आहेत. तर २४ तासात ६०० रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत.
( टीप – आय सी एम आर पोर्टलवर दर्शविलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दिनांक ७ मे २०२० पासूनच्या २३६ रुग्णांचा समावेश रिकॉन्सिलिएशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही. )
मृत्यू –
राज्यात ६३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये ३८, पुण्यात ९, औरंगाबाद शहरात ६, सोलापूर शहरामध्ये ३, रायगडमध्ये ३, आणि ठाणे जिल्ह्यात १, पनवेल शहरात १,लातूर मध्ये १, तसेच अमरावती शहरात १ मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ४४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ६७ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३४ रुग्ण आहेत तर २२ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ७ जण ४० वर्षांखालील आहे. या ६३ रुग्णांपैकी ४१ जणांमध्ये ( ६५ %) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ११९८ झाली आहे.
प्रयोगशाळा तपासण्या –
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २,७३,२३९ नमुन्यांपैकी २,४०,१८६जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ३३,०५३ जण पॉझिटिव्ह आले आहेत.
प्रयोगशालेय सर्वेक्षण – विश्लेषणात्मक माहिती
कोविड १९ पोर्टलवरील विश्लेषणानुसार, राज्याचे मार्च २०२० मध्ये प्रयोगशालेय नमुन्याचे दैनंदिन प्रमाण ६७९ एवढे होते ते मे २०२० मधील पहिल्या पंधरवडयात दिवसाला ८,६२८ प्रयोगशालेय नमुने इतके वाढले आहे. राज्याच्या प्रयोगशालेय सर्वेक्षणात मार्च महिन्याच्या तुलनेत सुमारे १३ पट वाढ झाली आहे, हे यावरुन स्पष्ट होते. सध्या देशात दर दशलक्ष लोकसंख्येमागे १६३० प्रयोगशाळा चाचण्या होत असून महाराष्ट्रात हे प्रमाण २१३७ एवढे आहे.
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना –
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या १६८८ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण १४,९७२ सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी ६३.८३ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.
इतर महत्वाचे मुद्दे –
2. सध्या राज्यात ३,४८,५०८ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १७,६३८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
मुंबई महानगरपालिका       २०१५० ७३४
ठाणे          २२८
ठाणे मनपा १५५० १८
नवी मुंबई मनपा १३६८ १४
कल्याण डोंबवली मनपा ५२०
उल्हासनगर मनपा १०१
भिवंडी निजामपूर मनपा ४८
मीरा भाईंदर मनपा ३००
पालघर ६१
१० वसई विरार मनपा ३५९ ११
११ रायगड २३९
१२ पनवेल मनपा २०६ ११
ठाणे मंडळ एकूण २५१३० ८११
१३ नाशिक १०५
१४ नाशिक मनपा ७१
१५ मालेगाव मनपा ६७५ ३४
१६ अहमदनगर ५६
१७ अहमदनगर मनपा १९
१८ धुळे १०
१९ धुळे मनपा ७०
२० जळगाव २०५ २६
२१ जळगाव मनपा ६१
२२ नंदूरबार २३
नाशिक मंडळ एकूण १२९५ ७८
२३ पुणे १९९
२४ पुणे मनपा ३४६४ १८८
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५८
२६ सोलापूर
२७ सोलापूर मनपा ३६४ २४
२८ सातारा १३१
पुणे मंडळ एकूण ४३२५ २२४
२९ कोल्हापूर ३०
३० कोल्हापूर मनपा
३१ सांगली ४२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा
३३ सिंधुदुर्ग १०
३४ रत्नागिरी ९५
कोल्हापूर मंडळ एकूण १९१
३५ औरंगाबाद ९७
३६ औरंगाबाद मनपा ८४२ ३१
३७ जालना २८
३८ हिंगोली ९६
३९ परभणी
४० परभणी मनपा
औरंगाबाद मंडळ एकूण १०६९ ३२
४१ लातूर ४२
४२ लातूर मनपा
४३ उस्मानाबाद
४४ बीड
४५ नांदेड
४६ नांदेड मनपा ६२
लातूर मंडळ एकूण १२३
४७ अकोला २८
४८ अकोला मनपा २४१ १३
४९ अमरावती
५० अमरावती मनपा १०४ १२
५१ यवतमाळ ९९
५२ बुलढाणा ३०
५३ वाशिम
अकोला मंडळ एकूण ५११ २९
५४ नागपूर
५५ नागपूर मनपा ३५५
५६ वर्धा
५७ भंडारा
५८ गोंदिया
५९ चंद्रपूर
६० चंद्रपूर मनपा
६१ गडचिरोली
नागपूर एकूण ३६८
इतर राज्ये ४१ १०
एकूण ३३०५३ ११९८

Check Also

महाराष्ट्रासह तीन राज्यांमध्ये होणार ‘नऊ’ ईएसआयसी रुग्णालयांची उभारणी

कर्मचारी राज्य विमा योजनेतंर्गत महाराष्ट्र, मध्यप्रदेश व उत्तराखंड राज्यांमध्ये नऊ ‘ईएसआयसी’ रुग्णालयांची उभारणी केली जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *