Breaking News

मुख्यमंत्री शिंदेंचे अजित पवारांना प्रत्युत्तर, हे खोके सरकार नाही तर… चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केला दावा

अजित दादा म्हणाले हे खोके सरकार आहे हे स्थगिती सरकार आहे हे घटनाबाह्य सरकार आहे एकच सांगू इच्छितो हे सरकार पूर्णपणे या देशाची जी घटना आहे बाबासाहेबांनी दिली त्याप्रमाणे कायदेशीर बहुमताच्या जोरावर सरकार स्थापन झालेल्या लोकांच्या जनमताच आदर राखून आणि सभागृहामध्ये मेजॉरिटी सिद्ध करून बहुमत सिद्ध करून हे सरकार स्थापन झाले. जे सरकार २०१९ ला आम्हाला जे घटनाबाह्य म्हणतात २०१९ ला जे सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं. सोयरीक एकाशी केली संसार दुसऱ्याशी थाटला हे सर्व जनतेला माहीत आहे आणि ज्या मतदारांच्या भावना मी त्याच्यात नंतर अधिवेशन आपल्याला बाकीचे मुद्दे ठेवायचे आहेत. त्यामुळे कोणी कुणाशी काय केलं हे महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे समजते आणि त्याचबरोबर त्यांनी म्हटले की हे ओके सरकार आहे असे प्रतित्तुर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना दिले.

विरोधी पक्षाने जो काही आग्रह धरला त्यावर उपमुख्यमंत्री महोदय आणि त्याला उत्तर दिलेले त्यांचे इच्छेप्रमाणे सगळे होईल विरोधी पक्षाच्या आणि खऱ्या अर्थाने जेव्हा सगळ्यांचा आग्रह होता या विदर्भातले आमदारांचा मंत्र्यांचा मागच्या सरकारमध्येच तेव्हा कोविडचं कारण देऊन ही अधिवेशन नागपूर मध्ये घेण्याचे टाळलेलं आहे ते अजित दादानांही माहित. त्यामुळे मी त्यावर काही बोलू इच्छित नसल्याचे ते म्हणाले.

राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मला आठवतंय की कोर्टाने देखील विधिमंडळाच्या कारभारावर स्थगिती द्या म्हणून विरोधी पक्षाने आग्रह धरला होता ते फेटाळले आणि जे सरकार २०१९ ला आम्हाला जे घटनाबाह्य म्हणतात २०१९ ला जे सरकार स्थापन झालं ते पूर्णपणे अनैतिक सरकार होतं. सोयरीक एकाशी केली संसार दुसऱ्याशी थाटला हे सर्व जनतेला माहीत आहे. पण अजित दादांच्या तोंडून ही भाषा त्यांची मला वाटतं शोधणारी नाही कारण खोक्यांचा जर एकावर एक शिडी लावला तेवढे शिखर उंच होईल. तिथे फक्त नजर पोहोचणार नाही पोचली तर तिथून कडेलोट होईल असा गर्भित इशाराही यावेळी दिला.

अनेक विभागांमध्ये तरतूद होती दोन हजार कोटीची मान्यता प्रशासकीय मान्यता ६००० कोटी ७००० कोटी म्हणजे हे काय चाललं होतं आणि खरं म्हणजे आमदनी अठन्नी आणि खर्चा रुपया आम्हाला या राज्याचा काही लवासा करायचा नाहीये. आणि म्हणून म्हणजे जे आपली जी तरतूद प्रमाणे वागले पाहिजे आपण आणि त्याच्यावर मी आता एवढेच बोलायचं बाकी स्थगिती जी आहे त्याला आम्ही प्रायोरिटी दिले. कामांना ज्याला जी जास्तीची महत्वाची काम आहेत आणि जवळपास आम्ही ७०-८० टक्के स्थगिती उठवली पण ज्यांना आवश्यक आहे ती ते काम आम्ही मंजुरी केलेली आहे. त्यामुळे कुठेही अंतर ठेवून आम्ही काम केले नाही अजित दादांना माहित आहे की पूर्वी जसं शिवसेना-भाजपाच देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार होत आणि बदलल्यानंतर महाविकास आघाडीचं आलं त्यावेळेस किती कामाला लागले असता किती दिले त्याचे अजित दादांना माहित आहे का, असा सवाल करत मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ते अर्थमंत्री होते. त्यामुळे मी त्याच्यावर डिटेल मध्ये जात नाही आणि जो अनुशेष आहे त्या बाबतीमध्ये उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेला आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये आणखी सीमा वादाचा देखील विषय काढला आता बघा हा काही नवीन नाही उपमुख्यमंत्री महोदय त्यावर बोलले नवीन विषय नाही आहे गेल्या अनेक वर्षापासून चा मुद्दा आहे या वेळेस आमचा आग्रह आणि विनंती लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि त्याच्यामध्ये मध्यस्थी केल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर मागच्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या सीमा वासियांच्या सुविधा होत्या जो मुख्यमंत्री धर्मादायनी तो बंद करून टाकला, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी योजनेसाठी  त्या सरकारने दिला नव्हता. जवळपास ९००० कोटी रुपये अपेक्षित आहेत ६४०० कोटी मंजूर झालाय ४८०० कोटी रुपये प्रत्यक्ष वितरण झालंय आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानाचा ७५५ कोटी रुपये ते त्याचेही वाटप झालेल आहे. त्याचबरोबर एनडीआरएफ च्या नॉर्म्स आम्ही बदलले इंडिया दुप्पट आम्ही मदत दिली दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले मर्यादा वाढवली आणि त्याचबरोबर जे आधीच्या सरकारने ५०,००० पर्यंत जे रेगुलर कर्ज फेड करत होते त्यांना इन्सेंटिव्ह देण्याचा जो निर्णय घेतला तो निर्णय अंमलबजावणी त्याची केली नव्हती. त्याची अंमलबजावणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

शरद पवार यांचा टोला, नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर आठवडा मंत्री

सध्या मे महिना सुरु असतानाच बाहेरील वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यातच लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *