Breaking News

रश्मी शुक्लाप्रकरणी पोलिसांचे समन्स फडणवीस म्हणाले, “जबाबासाठी बोलाविले, मी जाणार” या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असताना हे काय कोणता तपास करणार

राज्यातील पोलिस बदल्यांसंदर्भातील महाघोटाळा मी काही महिन्यापूर्वी भाजपा कार्यालयात उघडकीस आणला. त्यासंदर्भातील अहवाल माझ्याकडे होता. परंतु राज्य सरकारने त्यावर सहा महिन्यात कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे तो मी उघडकीस आणला. आता ही माहिती माझ्याकडे कशी आली याकरीता पोलिसांनी मला चौकशी करता बोलाविले असल्याने मी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडे चौकशीसाठी जाणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार आशिष शेलार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर हे ही उपस्थित होते.

वास्तविक पाहता पोलिसांनी यासंदर्भात चुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र मी विरोधी पक्षनेता असल्याने पोलिस मला त्याचा सोर्स विचारू शकत नाही. तसा प्रीव्हिलेज विरोधी पक्षनेता असल्याने मला आहे. मात्र मी यापूर्वी राज्याचा गृहमंत्री राहीलेलो असल्याने पोलिस तपासासाठी मी जाणार असून पोलिसांना जे सहकार्य करता येईल ते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रश्मी शुक्ला यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या पोलिस तक्रारीत चौकशीसाठी बोलाविण्यात आले आहे का? असा प्रश्न प्रसारमाध्यमांनी विचारला असता ते म्हणाले की, रश्मी शुक्ला यांची केस आणि मला चौकशीसाठी बोलाविण्यात आलेली केस या दोन्ही वेगवेगळ्या केसेस असल्याचा खुलासा करत तो रिपोर्ट सत्ताधाऱ्यांनी फोडला मी नाही. त्यासंदर्भातील पुरावे माझ्याकडे असल्याचेही त्यांनी सांगितले.

तसेच या गुन्ह्याची चौकशी आधीच सीबीआयकडून सुरू झालेली असून आता राज्याची पोलिस यंत्रणा काय चौकशी करणार हा खरा प्रश्न आहे. यापूर्वीच न्यायालयाने यासंदर्भातील जे काही माहिती हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, कागदपत्रे सीबीआयला देण्यास सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी सीबीआयकडे हस्तांतरीत केले आहेत. आता ते कोणते पुरावे शोधत आहेत असा सवाल करत आता ते बोलत आहेत. तर मी चौकशीसाठी सकाळी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पोलिसांनी यासंदर्भात मला पाचवेळा चौकशीसाठी प्रश्नावली पाठविली होती. परंतु त्याची उत्तरे त्यांना पाठविली नाहीत. त्यामुळे त्यांनी आता मला पुन्हा स्मरण पत्र पाठविल्याने मी चौकशीला जाणार आहे. याप्रकरणात घोटाळआ उघड करणाऱ्याला पोलिस चौकशीला बोलावत आहेत. ज्याने केला त्याला मात्र काहीच करत नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाणप्रकरणात माझ्याकडे १२५ तासापेक्षा जास्त पुरावे असून त्या सर्व पुराव्यांचे आधीच फोरेन्सिक ऑडिट मी केले आहे. ते सर्व पुरावे मी पोलिसांना देणार नाही. तर सीबीआयला देणार आहे. या गोष्टीचा भंडाफोड केल्यानंतर तीन दिवस प्रविण चव्हाण शांत का बसले? असा सवाल करत त्या तीन दिवसात सरकारने याप्रकरणी पुढील धोरण ठरविले असून यासंदर्भात एखादी तक्रार दाखल करायची आणि प्रकरण हॅशअप करायचे. तसेच यामध्ये एक नॅरेटीव्ह तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असून कॉऊंटर नॅरेटीव्ह करून हा विषय डायव्हर्ट करायचा असा एकंदरीत खेळ करायचा असे त्यांनी विधानसभेत उघडकीस आणलेल्या विरोधकां विरोधात करण्यात येत असलेल्या षढयंत्राबाबतील माहितीच्या अनुषंगाने त्यांनी केला

सायबर पोलिसांनी फडणवीस यांना पाठविलेले हेच ते पत्र

.

Check Also

बच्चन यांच्या दिवार चित्रपटाप्रमाणे त्यांच्या कपाळावर गद्दार असा शिक्का

शिवसेनेत बंडखोरी करून वेगळी चूल मांडणाऱ्या शिंदे गटाच्या आमदारांवर उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *