Breaking News

फडणवीसांच्या त्या बॉम्बवर वकील प्रविण चव्हाण म्हणाले, ते सर्व रेकॉर्डींग… वाक्य अर्धवट वापरली पूर्ण माहिती बाहेर येणे गरजेचे

अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका पेनड्राईव्हच्या माध्यमातून विरोधकांना संपविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारकडून कट कारकास्थान आखले जात असल्याचा गौप्यस्फोट करत मुंबईचे नवे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची नियुक्ती कशी झाले, शरद पवार, नवाब मलिक, अनिल गोटे, एकनाथ खडसे आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेकांशी संबधित खळबळजनक वक्तव्य असलेल्या रिकॉर्डींगचा गौप्यस्फोट केला. त्यावर राजकिय रणकंदन माजले असतानाच विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांनेही आपली बाजू मांडत फडणवीस यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत ते संपूर्ण रेकॉर्डिंग बाहेर आले पाहिजे अशी मागणी केली.
फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केल्याची माहिती चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दिली.

व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केले. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिले आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. तेजस मोरे तुरुंगात असून जामिनासाठी तो माझ्याकडे येत होता अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

“पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रकार परिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला १० कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल असे सांगणारे व्हिडीओ क्लिपमधील संभाषण देवेंद्र फडणवीसांनी विधासभेत वाचून दाखविले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ माजली.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *