Breaking News

Tag Archives: opposition leader pravin darekar

फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर तर मुख्यमंत्र्यांना आव्हान िंमत असेल तर माझ्यावर एफआयआर करा

हनुमान चालिसावरून सुरु झालेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरीने राजकिय वातावरण चांगलेच तापले असून राज्यात सध्या सुरु असलेल्या राजकिय नाट्यावरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार यांनी लक्ष्य केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देत म्हणाले की, जेव्हा गोष्टी जुन्या होतात, तेव्हा लोक विसरतात आणि सोयीच्या गोष्टी लक्षात ठेवतात. कोणी …

Read More »

रश्मी शुक्लाप्रकरणी पोलिसांचे समन्स फडणवीस म्हणाले, “जबाबासाठी बोलाविले, मी जाणार” या प्रकरणाचा तपास सीबीआय करत असताना हे काय कोणता तपास करणार

राज्यातील पोलिस बदल्यांसंदर्भातील महाघोटाळा मी काही महिन्यापूर्वी भाजपा कार्यालयात उघडकीस आणला. त्यासंदर्भातील अहवाल माझ्याकडे होता. परंतु राज्य सरकारने त्यावर सहा महिन्यात कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे तो मी उघडकीस आणला. आता ही माहिती माझ्याकडे कशी आली याकरीता पोलिसांनी मला चौकशी करता बोलाविले असल्याने मी बीकेसी येथील सायबर पोलिसांकडे चौकशीसाठी जाणार …

Read More »

विरोधी पक्षनेते प्रविण दरेकरांचा सवाल, पंच सूत्र आहे की कळ सूत्र सर्वसामान्यांचा भ्रमनिरास करणारा असल्याची केली टीका

राज्याच्या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणारी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. भाजपा सरकारच्या कार्यकाळातील योजनांचा विस्तार करून केवळ श्रेय लाटण्याचे काम महाविकास आघाडी सरकारने केले आहे. हा अर्थसंकल्प केवळ धनदांडगे, बिल्डर यांच्यासाठी आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व शेतमजूर यांचा विचार नाही, महिला, आदिवासी, धनगर, ओबीसी, मराठा आरक्षणाच्या संदर्भातील यंत्रणांना निधी …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटणार ? सभापती नाईक-निंबाळकरांनी दिले चर्चेचे आदेश विधान परिषदेतील लक्षवेधीवरील चर्चेवेळी सभापतींचे आदेश

मागील चार महिन्याहून अधिक काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत अद्याप तोडगा निघालेला नाही. तसेच मागील दोन दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचे विलीनीकरण शक्य नसल्याचा त्रिसदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारने मंजूर केलेला अहवालही विधानसभेत मांडला. तरी देखील हे आंदोलन संपले नसल्याने अखेर विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांनी …

Read More »

टिपू सुलतान वादावरून मलिक म्हणाले, दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही चुकीचं बोललो असेन तर राष्ट्रपतींना जाऊन विचारा - नवाब मलिक

मराठी ई-बातम्या टीम मालवणी येथील क्रिडा संकुलास टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून भाजपा नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर निशाला साधल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी दरेकरांच्या टिकेला प्रतित्युर देत प्रविण दरेकर हे मजूर सोसायटीचे कामकाज नाही असा उपरोधिक टोला लगावला. टिपू सुलतान …

Read More »

“त्या” आरोपावरून मलिकांवर भाजपा नेत्यांकडून टीकेचा भडीमार वानखेडेच्या पोस्टींगसाठी भाजपा नेत्याचे दिल्लीत लॉबींग- मलिकांचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बदली मुंबईतून होवू नये यासाठी भाजपातील एक बडा नेता दिल्लीत केंद्रीय गृह मंत्रालयात लॉबींग करत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जून्या केसेसमधील पंचावर जबाब बदलण्यासाठी एनसीबीकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मलिक …

Read More »

त्या दिवशी विधान परिषदेत काय घडले? उपसभापती कार्यालयाने दिला घटनाक्रम विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या कार्यालयाने दिली माहिती

मराठी ई-बातम्या टीम बोलण्याची संधी नाकारल्याच्या कारणावरून विधान परिषदेच्या उप सभापती नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी अविश्वास ठराव आणला आहे. मात्र त्या दिवशी अर्थात काल अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लक्षवेधीच्या वेळी नेमके काय झाले याची माहिती उप सभापती कार्यालयाने जाहिर केली आहे. ती माहिती खालील प्रमाणे …

Read More »