Breaking News

त्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल बाहेर, ते मृत्यू…. या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिलेला असतानाही राज्य सरकारकडून ऐन उन्हाच्या तडाख्यात निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १६ एप्रिलला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारमधील मंत्रीही उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला तब्बल २२ लाख नागरिक उपस्थित राहिल्याची माहितीही पुढे आली. पण, या कार्यक्रमावेळी तापमान भलतेच वाढल्याने १४ जणांच्या मृत्यू झाला. या सर्वांच्या शवविच्छेदन अहवाल पुढे आला आहे.

नवी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार दुपारच्या सुमारास पार पडला होता. तेव्हा तापमान ४२ अंश सेल्सियस असल्याने अनेकांना उष्माघाताची समस्या जाणवली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यातील १४ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना समोर आल्यानंतर शिंदे सरकारवर चौफेर टीका करण्यात येत आहे. त्यातच आता १४ जणांचा शवविच्छेदन अहवालात या सर्वांचा उष्मागातानेच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

शवविच्छेदन करणाऱ्या चमूतील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितल्यानुसार, १४ जणांचा मृत्यू उष्माघातामुळेच झाला आहे. या १४ पैकी १२ जणांचा शवविच्छेदन पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आलं होतं. तर, दोघांचं शवविच्छेदन अन्य रुग्णालयात करण्यात आलं. यातील दोन मृतांना इतर व्याधींनी ग्रासलं होतं, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

१४ मृतांमध्ये १० महिला आणि चार पुरुषांचा समावेश आहे. रविवारी १६ एप्रिल रोजी रात्री उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर, सोमवारी १७ एप्रिल रोजी दोन जणांचा मृत्यू झाला. अन्य दोघांचा दोन दिवसांत मृत्यू झाला होता.

शवविच्छेदन अहवाल चौकशी करत असलेल्या अधिकाऱ्यांना दिला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. मधुकर पांचाळ यांनी दिल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राने दिली.

हे शवविच्छेदन अहवाल बाहेर आल्यानंतर आता राज्य सरकार कोणावर कारवाईचा बडगा उगारणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या १४ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा देणार की स्वतःच केलेल्या चुकीबद्दल कायदेशीर गुन्हा दाखल करणार अशी चर्चा आता सुरु झाली आहे.

Check Also

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चार मतदारसंघात शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील २६- मुंबई उत्तर, २७- मुंबई उत्तर पश्चिम, २८- मुंबई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *