Breaking News

Tag Archives: maharashtra bhushan

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर

गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार …

Read More »

महाराष्ट्र भूषण सोहळा मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या विरोधात याचिका सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आणि सीबीआय चौकशीची उच्च न्यायालयात मागणी

१६ एप्रिल रोजी मुंबईतील खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळा पार पडला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला देशभरातून जवळपास १० लाख श्री सेवक उपस्थित होते. या श्री सेवकांना सुमारे सात-आठ तास उन्हात बसवून ठेवल्याने १४ जणांचा उष्माघाताने मृत्यू झाला. या प्रकरणावरून …

Read More »

त्या १४ जणांचा शवविच्छेदन अहवाल बाहेर, ते मृत्यू…. या निष्पाप जीवांच्या मृत्यूला कारणीभूत कोण?

हवामान खात्याने तापमान वाढीचा इशारा दिलेला असतानाही राज्य सरकारकडून ऐन उन्हाच्या तडाख्यात निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना १६ एप्रिलला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, खारघर प्रकरणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गप्प का ? खारघर प्रकरणाच्या चौकशीसाठी एक सदस्यीय सरकारी समिती म्हणजे निव्वळ धुळफेक

महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमात १४ लोकांचा मृत्यू हे शिंदे-फडणवीसांच्या निर्लज्ज सरकारचे बळी आहेत. सरकार आजही या प्रकरणावर मूग गिळून गप्प आहे. खारघर घटनेची चौकशी करण्यासाठी सरकारने महसूल विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली एक सदस्यीय समिती ही केवळ धुळफेक आहे. सरकारच सरकारची चौकशी करत असेल तर ती निष्पक्ष कशी …

Read More »

अखेर राज्य सरकारला सुचले शहाणपण, तोंडदेखली का होईना केली समिती स्थापन वस्तुस्थिती तपासण्यासाठी एक सदस्यीय समिती

राज्यात सत्तांतर होऊन जवळपास शिंदे-फ़डणवीस सरकारला नऊ महिन्याचा कालावधी होत आला आहे. या नऊ महिन्यात कधी नैसर्गिक तर कधी अपघाताने निष्पाप जिवाचे बळी गेले. परंतु या प्रत्येक घटनेत संबधित व्यक्ती आणि तेथील परिस्थिती जबाबदार होती. तरीही कार्यकर्त्ये असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतकांच्या कुटुंबियांना ५ लाखाची मदत तर जखमींवर शासकिय …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, त्या दुर्घटनेप्रकरणी शिंदे सरकार काय लपवतंय ? राज्यपालांना पत्र, खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून …

Read More »

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित, अजित पवार यांनी सुनावले, केली ही मागणी दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा; मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह ५ लाख रुपये मदत द्या

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, लाखो लोक रखरखत्या उन्हात अन् VIP लोक मात्र AC त, हा कुठला न्याय? शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन होते. या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका कार्यक्रमाला आलेल्या श्रीसदस्यांना बसला व उष्माघाताने १३ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला व ५०० च्या वर रुग्णालयात उपचार घेत आहेत, ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा …

Read More »

भर उन्हात कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून? उदय सामंत म्हणाले, त्यांच्याशी चर्चा करूनच वेळ ठरविली… कार्यक्रमाची वेळ हुकूमशाही पध्दतीने ठरविली नव्हती

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री परिवाराचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आला. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर पुन्हा ऐन उन्हाळा सुरु झालेला असताना खारघर येथे पुरस्कार …

Read More »

१३ जणांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र भूषण डॉ धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक

ऐन एप्रिलमध्ये बदलेल्या वातावरणामुळे नैसर्गिक तापमानात सातत्याने बदल घडून येत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतरही नवी मुंबईतील खारघर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या श्री सेविकांना उष्माघाताने त्रास होऊ लागला. त्यामुळे काल रात्रीत ११ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभरात आणखी दोघांची वाढ होत ही संख्या १३ …

Read More »