Breaking News

यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहिर

गतवर्षी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करत त्या सोहळ्याचे आयोजन नवी मुंबईतील सिडकोच्या मैदानावर भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात उष्माघाताने जवळपास १३ नागरिकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. यापार्श्वभूमीवर यावर्षीचा मराठी-हिंदी चित्रपटात चरित्र आणि विनोदी भूमिका साकारणारे अभिनेते अशोक सराफ यांना २०२३ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहिर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पहिल्यांदा अभिनेता म्हणून संधी दिली ती दादा कोंडके यांनी पांडू हवालदार चित्रपटात. आणि त्यानंतर आलेल्या राम राम गंगाराम चित्रपटात, या चित्रपटातील हजरजबाबी मुस्लिम खाटीकची भूमिका प्रचंड गाजली. तसेच “काटू क्या” या त्यांचा संवादही चांगलाच गाजला होता. त्यानंतर अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत अनेक चित्रपटात विनोदी भूमिका साकारल्या. कालांतराने अशोक सराफ यांनी आपला मोर्चा हिंदी चित्रपटांकडे वळविला. तेथेही अशोक सराफ यांनी संजय दत्त, शाहरूख खान, प्रसिध्द अभिनेते स्व. अमरिश पुरी यांच्यासह अमिताभ बच्चन सारख्या प्रतिथयश कलाकारांसोबतही खलनायकी स्वरूपाच्या परंतु विनोदी अभिनेत्याच्या व्यावसायिक चित्रपटातून भूमिका साकारल्या.

मध्यंतरीच्या काळात अशोक सराफ यांनी आपली माणसं, चौकट राजा सारख्या धीरगंभीर विषयावरील चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिकाही साकारल्या. या विविध भूमिका साकारणाऱ्या या अभिनेत्याने कलाक्षेत्रात केलेल्या अनेक भूमिकांच्या माध्यमातून अतुलनीय भरीव योगदान दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी एकमताने यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी निवड केली.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *