Breaking News

हिंदूत्ववादी राजकारणात भिजलेल्या राज्य सरकारची जनता जानेवारीतच तहानली

मागील काही महिन्यांपासून राज्यातील हिंदूत्वावादी राजकारणाला आणि हिंदूत्ववादी राजकारणाच्या नावाखाली देवळांच्या सुशोभिकरणासह, पर्यटन क्षेत्रे निर्माण करणे आणि आधीच तहानलेल्या जनतेच्या तोंडात पाण्याचा थेंब टाकण्याऐवजी देवळांच्या स्वच्छतेसाठी लाखो लीटर पाणी वाया घालविण्याचा नवा फंडा सध्या राज्य सरकार दरबारी सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीर हिंदूत्ववादी राजकारणाच्या अखंड डोहात बुडालेल्या आणि भिजलेल्या जनतेला मात्र तहान कशी भागावयाची याचा प्रश्न सातत्याने भेडसावत आहे. तर राज्यातील धरणांमध्ये अवघा ५५ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला असल्याने आगामी चार महिने उन्हाळ्यात तहानलेल्या जनतेची तहान कोण भागविणार असा सवाल काही जबाबदार प्रशासकिय अधिकाऱ्यांसह सुज्ञ नागरिकांना पडला आहे.

गतवर्षी अर्थात २०२२-२३ साली महाराष्ट्रात चांगला पाऊस झाल्याने जानेवारीच्या अखेरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ असा सहा विभागात फक्त पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्यानंतर फक्त ५ टँकर सुरु करण्यात आले होते. तर राज्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणीसाठी शिल्लक राहिल्याचे दिसून आले होते. त्यामुळे गेल्यावर्षी पाण्याचे दुर्भिक्ष राज्यात जाणवले नाही.

यंदाच्या २०२३-२४ मध्ये पावसाळा दिवाळीपर्यंत लांबल्याचे चित्र महाराष्ट्रभर दिसत होते. पण या लांबलेल्या पावसाचा फायदा ना महाराष्ट्रातील जनतेला होताना दिसला ना राज्यातील शेतकऱ्यांना झाल्याचे दिसून आले. त्यातच सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचे भारतीय हवामान विभागाने आणि राज्याच्या आपतकालीन व मदत व पुर्नवसन विभागाकडून सांगण्यात आले.

त्यामुळे अद्याप २०२४ चा जानेवारी महिना संपलेला नसताना राज्याच्या धरणातील पाणीसाठी तब्बल ५५ टक्के इतका कमी राहिला आहे. तर गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ-अमरावती आणि नागपूर या दोन विभागात मिळून ४५६ गावांमध्ये राज्यातील १०८७ वाड्यांवर पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. त्यामुळे या भागातील जनतेला ४७ शासकिय टँकर्स आणि ४५६ खाजगी टँकर्सच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

राज्यातील धरणातील पाण्याची स्थिती

महाराष्ट्रातील महसूली विभागानुसार त्या त्या भागात राहणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता पाणी साठवणूकीचे मोठे, मध्यम आणि लहान स्वरूपाचे धरण-तलाव पाणी प्रकल्प राज्य सरकारने उभारले आहेत.

यानुसार नागपूर क्षेत्रातील जिल्हे आणि गावांची तहान भागविण्यासाठी ३८३ पाणी धरणं उभारण्यात आली. यातील सर्व धरणांमध्ये ६२.३८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर गेल्यावर्षी याच महिन्यात ७५.३२ टक्के पाणीसाठी शिल्लक राहिला होता.

अमरावती विभागात २६२ धरणे उभारण्यात आली आहेत. या धरणांमध्ये ६५.११ टक्के पाणीसाठा आजस्थितीला शिल्लक राहिला असून गतवर्षी याच धरणांमध्ये ८३.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. औरंगाबाद विभागात ९२० धरण क्षेत्रे असून या सर्व धरणांमध्ये ३१.९३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून गत वर्षी या सर्व धरणांमध्ये ८०.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. नाशिक विभागात ५३७ धरण क्षेत्रे उभारण्यात आली आहेत. या धरणक्षेत्रांमध्ये सद्यस्थितीत ५८.१३ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला असून गतवर्षी हाच पाणीसाठा ८५.९४ टक्के पाणीसाठा होता.

याशिवाय पुणे विभागात ७२० धरण क्षेत्रे असून या धरणक्षेत्रांमध्ये आजस्थितीत ५६.८९ टक्के पाणी साठा शिल्लक राहिला आहे. गतवर्षी याच महिन्यात ८०.७२ टक्के होता. कोकणात विभागात १७३ टक्के धरण क्षेत्रे आहेत. या धरणांमध्ये आजस्थितीला ६८.९८ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला असून गतवर्षी याच महिन्यात ७८.८३ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. तर महाराष्ट्रातील सर्व धरणांमधील पाणीसाठ्याचा विचार करता आजस्थितीला ५५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तर गतवर्षी याच जानेवारी महिन्याच्या अखेरीस ८०.८४ टक्के पाणीसाठा शिल्लक होता असे उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे.

या सर्व धरणांमधील मृत पाण्याचा साठा ७७५६ मिली क्युबिक लिटर पाणीसाठा आहे. ४० हजार ४८५ मिली क्युबिक लिटर जीवंत पाणीसाठा (पाणी पुरवठ्यासाठीचा पाणीसाठा) शिल्लक आहे.

महसूली विभागनिहाय धरणातील पाणीसाठा

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा दावा, निलंबनाचा प्रस्ताव विरोधकांकडूनच …

मागील जवळपास एक आठवड्याहून अधिक काळ संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु असताना देशातील दोन तरूणांनी लोकसभा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *