Breaking News

अहमदबादमध्ये शाहरुख खानला दाखल केले रूग्णालयात

शाहरुख खानला बुधवार, २२ मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. केडी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खानला डिहायड्रेशनचा त्रास होता. मंगळवारी अहमदाबादमध्ये KKR आणि SRH यांच्यातील प्ले-ऑफ सामना झाला. या मॅचसाठी शाहरुख दोन दिवसांपूर्वी अहमदाबादला पोहोचला होता.

सामना संपल्यानंतर, शाहरूख खान SRK रात्री उशिरा टीमसह अहमदाबादमधील आयटीसीच्या ITC नर्मदा हॉटेलमध्ये पोहोचला, जिथे त्यांचे भव्य स्वागत झाले.

सकाळी त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने शाहरुखला दुपारी एकच्या सुमारास केडी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांनी त्यांना पुरेशी विश्रांती घेण्यास सांगितले आहे.
नंतर, शाहरूख खान SRK ची पत्नी आणि डिझायनर गौरी खान, उद्योगपती जय मेहता आणि अभिनेत्री जुही चावला यांनी अभिनेता शाहरूख खानला भेटण्यासाठी भेट दिली.

भारताच्या अनेक भागांसह अहमदाबादमध्ये उच्च तापमानाची नोंद झाली आहे. गुजरातच्या राजधानीचे तापमान ४५ अंशांच्या आसपास होते आणि हवामान खात्यानेही अहमदाबाद शहरात रेड अलर्ट जारी केला आहे.

Check Also

मालेगावातील त्या व्हायरल व्हिडीओवरून सलमान खानचे चाहत्यांना आवाहन

बहुचर्चित टायगर फ्रांयचसीसमधील टायगर-३ चित्रपट मुंबईसह देशभरात आज प्रदर्शित झाला. मात्र मालेगावातील एका चित्रपटगृहात टायगर-३ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *