Breaking News

“सत्यशोधक” चित्रपट पाहिल्यानंतर छगन भुजबळ यांची मोठी घोषणा चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी

सत्यशोधक चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुले यांच्या जीवनपटाची अतिशय उत्तम मांडणी केलेली आहे. महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सत्यशोधक चित्रपट महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरच टॅक्स फ्री करण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

क्रांतीसुर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सत्यशोधक चित्रपटाचा प्रीमियर शो नाशिक येथील सिटी सेंटर पिव्हीआर चित्रपट गृहात पार पडला. या प्रीमियर शोसाठी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. हा चित्रपट पाहताना छगन भुजबळ भावूक झाल्याचे बघावयास मिळाले.

यावेळी चित्रपटाचे निर्माते, विविध कलाकार सहकलाकार माजी आमदार तुकाराम बिडकर यांच्यासह पदाधिकारी व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक व सहकलाकारांचा सत्कार केला.

यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, महात्मा फुले यांचा जीवनपट अतिशय उत्तम प्रमाणे सत्यशोधक चित्रपटात मांडणी करण्यात आली आहे. महात्मा फुले यांचं कार्य बघता एका सिनेमात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार मांडले जाऊ शकत नाही. तर प्रत्येक विषय घेऊन चित्रपट काढावे लागतील असे त्यांनी सांगितले.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, कुठल्याही धर्माच्या विरोधात महात्मा फुले यांचा लढा नव्हता. त्यांचं लढा ब्राम्हणांच्या विरुद्ध नव्हे तर ब्राम्हण्य वादाच्या विरोधात होता. जो पर्यंत आपण आपला हा इतिहास माहिती होत नाही तो पर्यंत आपल्याला समाज सुधारकांचे विचार आपल्याला तळागाळात पोहचवता येणार नाही. त्यासाठी सत्यशोधक चित्रपट हा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असून महाराष्ट्र भरातील सर्वांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन यावेळी केले.

Check Also

गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी या तीन मराठी चित्रपटांची निवड मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

यंदाच्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी महाराष्ट्र शासनाकडून ग्लोबल आडगाव, गिरकी आणि बटरफ्लाय या तीन मराठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *