Breaking News

मालेगावातील त्या व्हायरल व्हिडीओवरून सलमान खानचे चाहत्यांना आवाहन

बहुचर्चित टायगर फ्रांयचसीसमधील टायगर-३ चित्रपट मुंबईसह देशभरात आज प्रदर्शित झाला. मात्र मालेगावातील एका चित्रपटगृहात टायगर-३ चित्रपटाचा शो सुरु असताना काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहातच दिवाळीचे फटाके फोडल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला. चित्रपटगृहातच फटाके फोडण्यास सुरुवात झाल्याने अनेक प्रेक्षकांनी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बसल्या जागेवरून लांब जाणे पसंत केले. या पार्श्वभूमीवर सलमान खानने आपल्या चाहत्यांना ट्विट करत आवाहन केले.

नेहमीप्रमाणे सलमानच्या चाहत्यांनी टायगर-३ चित्रपट पहिल्या दिवशी पहिला शो पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मात्र आज मालेगांवातील एका चित्रपटगृहात टायगर-३ चित्रपटातील सलमान खानच्या एन्ट्रीचा सीन सुरु होताच काही प्रेक्षकांनी चित्रपटगृहात दिवाळीचे फटाके उडविल्याचा एक व्हिडिओ आज सकाळी व्हायरल झाला.

सलमान खानने मालेगाव मधील चित्रपटगृहातील फटाके फोडल्याचा ट्विट करत म्हणाला की, आमच्या ऐकण्यात आले आहेय की काही टायगर-३ चित्रपटाच्यावेळी चित्रपटगृहात फटाके फोडले. चाहत्यांनी चित्रपटगृहात फटाके फोडून स्वतःचा आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालू नये. फक्त चित्रपटांचा आनंद घ्यावा असे आवाहन केले.

Check Also

किसिंग सीनविषयी सुरु असलेल्या चर्चांवर धर्मेंद्र यांनी सोडले मौन शबाना आझमी यांच्याबरोबरच्या किसींगसीनवर पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया

करण जोहर याचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट चांगलाच हिट झाला. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *