Breaking News

डोंबिवली एमआयडीसी-२ मधील एका कंपनीत बॉयलर स्फोट मोठ्या प्रमाणावर कंपनी आवारात आग, ४ ते ५ कामगार गंभीर जखमी

डोंबिवली एमआयडीसी-२ मधील अमोदन-ओमेगा कंपनीत अचानक बॉयलरचा स्फोट भर दुपारी २ च्या सुमारास झाला. स्फोटानंतर कंपनीत मोठ्या प्रमाणार आग लागून काळ्याकुट्ट धुराचे लोट आकाशात उडाल्याचे ३ ते ५ किमीच्या परिसरातून उठल्याचे दिसून येत आहे. तर स्फोटाच्या हादऱ्यात अनेक रहिवाशी इमारतींच्या काचांना हादरे बसून काचा फुटल्याचे दिसून आल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तर आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाच्या ५ ते ६ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. घटनास्थळावरून २० ते २५ कामगारांना कंपनीच्या परिसरातून बाहेर काढण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.

काही वर्षापूर्वी २०१६ साली एमआयडीसी-२ मधील प्रोबेश केमिकल्स कंपनीच्या बॉयलरमध्ये असाच स्फोट झाला होता. त्यावेळी कंपनीतील अनेक भागात आग लागली. तर स्फोटाच्या तीव्रतेमुळे कंपनीच्या अनेक कामगारांचे मृतदेह दूरवर फेकले गेले होते. तर काही जणांचे मृतदेह शोधण्यास काही काळाचा अवधी लागला होता. अगदी तसाच स्वरुपाचा बॉयलर स्फोट झाला. मात्र या स्फोटामुळे किती कामगारांची जीवीतहानी झाली याची माहिती अद्याप हाती आली नाही. परंतु कंपनीत मोठ्या प्रमाणावर आग लागल्याचे दिसून येत आहे. या कंपनीत झालेल्या स्फोटामुळे कंपनीच्या शेजारी असलेल्या इतर कंपन्यांमधील कामगारांवर परिणाम झाला. त्यामुळे या शेजारील कंपन्यांमधील कामगारांनी कंपनीच्या बाहेर बचावासाठी धाव घेतली. तर काही जणांना दुखपती झाल्याचे काही कामगारांनी सांगितले.

यासंदर्भात कल्याण-डोंबिवलीचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता म्हणाले की, या एमआयडीसी-२ मधील सर्व कंपन्यांचे फायर ऑडीट करण्याचे आदेश राज्य सरकारने यापूर्वीच कंपन्यांना देण्यात आलेले आहेत. परंतु तरीही काही जणांनी असा पध्दतीचे फायर ऑटीड केले नसल्याचे दिसून येत असल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे दिसून येत आहे. अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगत लागलेली आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून करण्यात येत असल्याचेही सांगितले.

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिवडी येथील मतमोजणी केंद्राची पाहणी आणि आढावा मुंबईची मतमोजणी शिवडी येथे होणार

मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ४ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *