Breaking News

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी
केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला.
विशेषतः धुळे, जळगांव, औरंगाबाद, नांदेड, परभणी, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, डहाणू, औरंगाबाद, मुंबईतील उपनगर असलेल्या कल्याण आदी भागात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. त्याचबरोबर राज्यातील सर्वच जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यातील व्यवहार बंद ठेवून तर शहरांमध्ये मुख्य बाजारपेठा बंद ठेवत सहभाग नोंदविला.
तर अनेक शहरातील दुकान व्यापारांनी आपली दुकाने बंद ठेवली. काही ठिकाणी अपवाद वगळता व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंदच ठेवली. याशिवाय जवळपास प्रत्येक जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आंदोलने करत शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. तर काही ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करत यात सहभाग नोंदविला.
दरम्यान, आंदोलन अपयशी ठरत असल्याचे किंवा दुकाने बंद करण्यास व्यापारी नकार देत असल्याचे काही व्हिडिओ समाज माध्यमात प्रसारीत करत आंदोलनाला सर्वसामान्य नागरिकांचा विरोध असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न भाजपा समर्थकांकडून करण्यात आला.

Check Also

देवेंद्र फडणवीसांनी रिझर्व्ह बँक गव्हर्नरांना भेटून केली ही मागणी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठ्यासाठी सहकारी, जिल्हा बँकांना परवानगी द्या!

मुंबई: प्रतिनिधी स्वयंपुनर्विकास योजनेत सहकारी गृहनिर्माण संस्थांना वित्तपुरवठा करता यावा, यासाठी राज्य सहकारी बँक, जिल्हा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *