Breaking News

Tag Archives: palghar

वाढवण बंदर प्रकल्प रोजगार वृद्धीसह स्थानिकांच्या विकासासाठी पूरक

वाढवण बंदर प्रकल्प हा फक्त राज्याच्या नव्हे, तर देशाच्या विकासाच्यादृष्टीने महत्त्वाचा व हिताचा तसेच रोजगार वृद्धी करणारा प्रकल्प आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या उभारणीसाठी सर्वांनी समन्वयाने सकारात्मकरित्या मार्ग काढला पाहिजे. पालघर जिल्ह्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन हा प्रकल्प यशस्व‍िरित्या पूर्णत्वास नेला पाहिजे. वाढवण बंदर प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा हा भूमिपुत्र व …

Read More »

मुंबई, पुणे, पालघर, रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

पर्यटनाला चालना देण्यासाठी, पारंपारिक कला व संस्कृतीची ओळख देशी-विदेशी पर्यटकांना करुन देण्यासाठी तसेच गणेशोत्सवला आंतरराष्ट्रीयस्तरावर पर्यटनात्मक प्रसिद्धी आंतरराष्ट्रीय गणेश महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १९ ते २८ सप्टेंबर या कालावधीत मुंबई, पुणे, पालघर व रत्नागिरी येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. मंत्री महाजन …

Read More »

या पाच जिल्ह्यांच्या सागरी क्षेत्राच्या आराखड्यास केंद्राची मान्यता पंतप्रधान नरेंद्र मोदी, पर्यावरण मंत्री यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मानले आभार

महाराष्ट्रातील मुंबई वगळून इतर पाच सागरी जिल्ह्यांकरिता सागरी क्षेत्राच्या आराखड्यास (सी.झेड.एम.पी.) मान्यता दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आभार मानले आहेत. हा आराखडा मार्गी लागल्यामुळे या पाच जिल्ह्यांमधील अनेक लोकोपयोगी प्रकल्प तसेच खासगी गुंतवणुकीमधील प्रकल्प मार्गी लागतील तसेच पायाभूत सुविधांच्या कामांनाही मोठा …

Read More »

एकत्र जाऊनही एकमेकांकडे न पाहणारे, नंतर मात्र मुख्यमंत्री म्हणाले, ये फेव्हिकॉल का मजबूज जोड

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून हवे असल्याचा एका सर्व्हेचा अहवाल देत बहुतांष प्रसारमाध्यमांमध्ये मोठ मोठ्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये खट्टास निर्माण झाल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या वादप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »

सामुदायिक सोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

आदिवासी तसेच आर्थिक दुर्बल घटकातील वधू-वर सामुदायिक विवाह सोहळ्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. सामुदायिक विवाहसोहळ्यातील विवाहासाठीच्या अनुदानात २५ हजारांपर्यंत वाढ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवली. पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे आयोजित सामुदायिक विवाह सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी आमदार रवींद्र फाटक, राजेश पाटील, श्रीनिवास वनगा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष …

Read More »

नितीन गडकरीजी, पंतप्रधान मोदीजी आणि मुख्यमंत्री शिंदेजी हाच का तो विकास? जमिनीची किंमत न देताच आदिवासींना घरातून बाहेर काढण्यासाठी पोलिसांकडून जोर जबरदस्ती

काही महिन्यांपूर्वी राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार असताना मराठवाड्यातील एका रस्ते प्रकल्पासाठी स्थानिक पातळीवर शिवसेना कार्यकर्त्ये जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचा जाहिर उल्लेख केंद्रीय रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी करत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही रस्ते विकासाच्या माध्यमातून विकासाची गंगा आणत सबका साथ सबका …

Read More »

कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून इशारा दिला

हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते २०० मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोंकण विभागात पालघर जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ६६ मिमी. पाऊस झाला असून सद्यस्थिती मध्ये जिल्ह्यातील परिस्थिती …

Read More »

पालघर नगरपरिषद, बोईसर ग्रामपंचायतीचा झोपु प्राधिकरणामध्ये समावेश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील वाढत्या झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारकडून हक्काचे घर देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाची हद्दीत आता ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर नंतर आता पालघर आणि बोईसर नगरपंचायतीचा समावेश करण्यात आला असून यासंदर्भातील निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर नगरपरिषद व बोईसर ग्रामपंचायतीचा …

Read More »

काँग्रेस, भाजपाच्या विरोधानंतरही ओबीसींच्या त्या रिक्त जागांसाठी निवडणूका १९ जुलै २०२१ रोजी मतदान; तर २० जुलै २०२१ रोजी निकाल-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे धुळे, नंदूरबार, अकोला, वाशिम व नागपूरमधील ५ जिल्हा परिषदा आणि ३३ पंचायत समित्यांवरील सदस्यांच्या निवडणूकीसाठी असलेले ओबीसी आरक्षण रद्दबातल ठरले. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागांसाठी काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार आणि भाजपाच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी या रिक्त जागांसाठी निवडणूका न घेण्याचे आव्हान केले. …

Read More »

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …

Read More »