Breaking News

भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या अजित पवारांच्या शुध्दीकरणाची भाजपाकडून सुरुवात विदर्भ पाटबंधारेतील ९ प्रकल्पांच्या नस्तीबंद करण्याचे आदेश

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरील भ्रष्टाचाराचे डाग पुसून काढण्याच्या हालचाली भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केली. या शुध्दीकरणाच्या माध्यमातून सिंचन घोटाळ्यातील विदर्भ पाटबंधारे अंतर्गत असलेल्या ९ प्रकल्पांच्या चौकशीच्या फाईली बंद करण्याचे आदेश एसीबीने दिले.
विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर ७० हजार कोटी रूपयांचा सिंचन घोटाळा कऱण्यात आल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात येत होता. तसेच त्याची एसीबी अर्थात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशीही सुरु करण्यात आली होती. या चौकशीसाठी एसीबीने अजित पवारांना दोन ते तीन वेळा बोलाविले होते.
मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला बंडखोर नेते अजित पवार यांनी पाठिंबा दिल्याने त्यांना उपमुख्यमंत्रीपदी बसविण्यात आले. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशी नस्तीबंद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. तसे आदेशही त्यांनी एसीबीला दिले असून त्यासंदर्भातील परिपत्रकही जाहीर करण्यात आले.

दरम्यान, एसीबीप्रमुख परबीर सिंग यांनी सिंचन प्रकल्पातील २ हजार ५०० प्रकल्पांचा तपास आम्ही करत असून या बंद करण्यात आलेल्या फाईली सिंचन घोटाळ्यातील नाहीत. तसेच त्याबाबतची चौकशी स्वतंत्रपणे सुरुच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  
विदर्भ पाटबंधारे प्रकल्पातील खालील चौकशांच्या फाईली बंद
१)वाशिम जिल्ह्यातील गोडेगांव ल.पा.प्रकल्प
२)यवतमाळ मधील पागपहूर ल.पा. प्रकल्प
३)अमरावतीतील सापन नदी प्रकल्प
४) अमरावतीतील पांढरी नदी प्रकल्प
५) बुलढाण्यातील खडकपूर्णा प्रकल्प
६)यवतमाळ मधील कोहन लघु प्रकल्प
७)यवतमाळ मधील बेंबळा प्रकल्प
८) यवतमाळ मधील बेंबळा प्रकल्प
९)यवतमाळ मधईल बेंबळा प्रकल्प

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *