Breaking News

मुख्यमंत्री शिंदे यांचा उपरोधिक टोला, जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले धास्ती घेतली की नाही माहित नाही पण कामाला लागले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः ठाणे रेल्वेस्थानकात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बातचित केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते की, ‘राम हे दैवत असून मी सुद्धा अयोध्येला जाणार आहे. पटोले यांच्या वक्तव्यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता, शिंदे म्हणाले की, आमच्यामुळे का होईना अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घेत आहेत हे चांगलं आहे. यावर माध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की, तुमच्या अयोध्या दौऱ्याची विरोधकांनी धास्ती घेतली आहे, असं तुम्हाला वाटतं का? या प्रश्नावर उत्तर देताना शिंदे यांनी विरोधकांना आणि प्रामुख्याने शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांना त्यांच्या नावाचा उल्लेख टाळत टोला लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या दौऱ्याची त्यांनी धास्ती घेतलीय की नाही हे मी म्हणणार नाही. पण मी सर्वांना कामाला लावलंय ही वस्तूस्थिती आहे. जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले आहेत, फिरू लागले आहेत ही चांगली बाब आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अनेकदा उद्धव ठाकरे वेळ देत नाहीत, मातोश्रीबाहेर पडत नाही, अशी टीका केली होती.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात सीबीआयकडून ब्लू कॉर्नर नोटीस

हसन लोकसभा मतदारसंघातील जनता दल एस चे उमेदवार प्रज्वल रेवन्ना याच्या कथित सेक्स स्कॅडलचे प्रकरण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *