Breaking News

राहुल गांधी म्हणाले, मी या देशाला थोडंफार ओळखतो, पण आता तुम्ही थाबंयला हवे संसदेत भाजपावर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

मराठी ई-बातम्या टीम

नवी दिल्लीत संसदेच्या अधिवेशाला नुकतीच सुरुवात झालेली आहे. त्यातच तेथील थंडीचे तापमान १० अंश सेल्सियसवर असताना अर्थसंकल्पानंतर मात्र येथील राजकिय वातावरण चांगलच तापायला सुरुवात झाली आहे. आज काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी चांगलीच बॅटींग करत मोदी सरकारला टीकेच्या बाणातून घायाळ करत तुम्ही इतिहासाचं आकलन करण्यात कमी पडत असून मी या देशाला थोडंफार ओळखतो पण आता तुम्हाला थांबायला हवं अशी सूचना केली.

तसेच तुम्ही एका अत्यंत धोकादायक गोष्टीशी खेळत आहात, असा इशाराही त्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारला दिला.

मला हे समजतंय. तुम्ही कदाचित ते मान्य करणार नाहीत. पण माझ्या पणजोबांनी हा देश उभा करताना १५ वर्षे तुरुंगात काढली. माझ्या आजीवर ३२ गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझ्या वडिलांच्या चिंधड्या उडवण्यात आल्या. त्यामुळे मी या देशाला थोडंफार ओळखतो. माझ्या पणजोबांनी, माझ्या आजीने आणि माझ्या वडिलांनी या देशासाठी रक्त सांडले आहे. तुम्ही एका अत्यंत धोकादायक गोष्टीशी खेळत आहात. माझा तुम्हाला सल्ला आहे की थांबा. कारण जर तुम्ही थांबला नाहीत, तर तुम्ही समस्या निर्माण कराल असा इशारा त्यांनी दिला.

पूर्वेकडील राज्ये, तामिळनाडू, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचे संदर्भ दिले. तुम्ही आधीच समस्या निर्माण करायला सुरुवात केली आहे. पूर्वेकडे समस्या सुरू झाली आहे. तामिळनाडूमध्येही समस्या निर्माण होत आहेत. त्या तुम्हाला दिसणं आता बंद झालं आहे. जम्मू-काश्मीरमध्ये देखील समस्या निर्माण होत आहेत. तुम्ही जे करत आहेत, त्यातून तुमचं इतिहासाचं आकलन कमी असल्याचं दिसून येत आहे अशी टीका करत देशातील पूर्व, दक्षिण आणि जम्मू काश्मीरमध्ये धोरणाची अंमलबजावणी करण्यात कमी पडत असल्याचे राहुल गांधी यांनी दाखवून दिले.

त्याचबरोबर मागे वळून भारतावर राज्य केलेल्या सर्व साम्राज्यांकडे काळजीपूर्वक पाहा. तुम्हाला हे लक्षात येईल की त्यातलं प्रत्येक साम्राज्य संघराज्य होतं. सम्राट अशोक प्रत्येक ठिकाणी अशोकस्तंभ उभे करायचे कारण ते एक असं संघराज्य होतं जिथे सम्राट अशोक प्रत्येकाचा सन्मान करायचे. तुम्ही प्रत्येकाचा अपमान करत आहात. तुम्ही माझा अपमान करा. मला त्याने फरक पडत नाही. पण तुम्ही या देशाच्या लोकांचा अपमान करू शकत नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

संसदेच्या अगदी सुरुवातीच्या कालखंडातच काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल चढवतील असे कोणत्याच राजकिय पक्षाला वाटले नव्हते. पंरतु त्यांनी आज मोदी सरकारच्या कारभारावर चांगलेच टीकास्त्र सोडल्याचे दिसून येत आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *