Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

पोलिसांबरोबर काम करू, एकतर गाडीची व्यवस्था करा नाहीतर घराजवळ नियुक्ती द्या संघटनेचे प्रशासनाला पत्र

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर मुंबईतून परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या मुळ गावी जात आहेत. या कामगारांना त्यांच्या गावी पाठविण्यासाठी पोलिस दलास मदत करण्यासाठी मंत्रालयातील १४५७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंत्रालयातील अनेक कर्मचारी हे उपनगरात रहात असल्याने त्यांच्या येण्यासाठी सध्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. त्यामुळे त्यांच्या येण्यासाठी एक तर …

Read More »

मान्सूनचे मुंबईत ११ जूनला आगमन १८ जून पर्यंत राज्यात पोहोचणार

मुंबई: प्रतिनिधी राज्यात मे महिना संपण्यासाठी अवघे १० दिवस शिल्लक राहीलेले आहेत. लॉकडाऊन असला तरी आणि सततच्या तापमान वाढीमुळे नागरिकांना धड घरातही बसता येईना आणि बाहेरही जाता येईना. मात्र आता नागरिकांना दिलासादायक वृत्त असून यंदा मान्सूनचे ११ जूनला मुंबईत आगमन होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून त्यादृष्टीने पिकांचे नियोजन करावे …

Read More »

अन्नधान्याची गरज आणि आर्थिक संकटातून मुक्तीसाठी आता कृषी क्षेत्रावरच भिस्त राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे मत

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने पुढील काळासाठी कृषी विभागाने आखणी करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले तर कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार …

Read More »

राज्यपालांना भेटणारे फडणवीस कदाचित मुख्यमंत्र्यांचा नंबर विसरलेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रजयंत पाटील यांची भाजपाला उपरोधिक टोला

मुंबई: प्रतिनिधी फडणवीस म्हणतात आम्हाला विचारले जात नाही म्हणून आम्ही राज्यपालांना भेटतो. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी इतके वर्षे काम केलंय आता मात्र मुख्यमंत्र्यांचा नंबर ते विसरलेत का अशी असा उपरोधिक सवाल करत तुमच्या सुचना असतील तर मन मोठे करून मुख्यमंत्र्यांसमोर व्यक्त व्हा असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन ११ राष्ट्रीय संघटना उतरणार

मुंबई: प्रतिनिधी सद्यस्थितीत केंद्र आणि राज्य सरकारांनी कामगार विरोधी धोरणांमध्ये वाढ केली आहे. या विरोधात देशातील प्रमुख ११ राष्ट्रीय संघटनांनी शुक्रवार २२ मे रोजी देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात देशभरातील सरकारी कर्मचारी सामील होणार आहेत. राज्यातही मध्यवर्तीच्या संघटनेच्या समर्थ नेतृत्त्वाखाली हे लक्षवेध आंदोलन जाहीर करण्यात आले आहे. आंदोलनातील …

Read More »

कंटेन्मेंट क्षेत्र वगळता चित्रकरणास परवानगी : लोककला, तमाशा कलावंतांचा विचार करणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे मनोरंजन क्षेत्रातील कलाकार, निर्मात्यांना आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन करीत मर्यादित प्रमाणात चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार …

Read More »

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांचे झाले बाकीच्या ६ विभागाचे काय? कोरोना योध्दे अथवा इतर कमी पडत असलेल्या ठिकाणी या विभागातील अधिकाऱ्यांनाही पाठवा

मुंबई: प्रतिनिधी कोरोना युध्दात सध्या मुंबई महापालिकेच्या अत्यावश्यक सेवांसहित बिगर अत्यावश्यक सेवांमधील कामगार, कर्मचारी तसेच अधिकारी आणि पोलिस दलातील कर्मचारीही जीव धोक्यात घालून काम करत आहेत. यातील पोलिसांच्या मदतीसाठी मंत्रालयातील १४२१ कर्मचाऱ्यांना पोलिसांच्या दिमतीला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र विक्री कर, रेशनिंग ऑफिस, म्हाडा, एसआरए, एमएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम …

Read More »

आपतकालीन परिस्थितीतही चॅरिटेबल रूग्णालयांतील खाटा रिकाम्या आणि सरकार ढिम्म १७४० पैकी १५४० खाटांवर गरीब आणि गरजू रूग्ण नाहीच:

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारकडून आणि मुंबई महापालिका यंत्रणेकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी खासगी रूग्णालयातील ८० टक्के खाटा अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेतला. मात्र याच राज्य सरकारच्या जीवावर मुंबई आणि उपनगरात स्वत:च्या अलिशान हॉस्पीटलसाठी कवडीमोल भावात किंवा स्वस्तात जमिनी मिळविणाऱ्या चॅरिटेबल अर्थात धर्मादाय रूग्णालयांनी गरीब, गरजू …

Read More »

पोलिसांच्या दिमतीला १९ अवर सचिवांची नियुक्ती : डिव्हॅल्युएशन झाल्याची भावना ग्रामविकास विभागातील कर्मचारी का कमी ?

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांचा प्रश्न जटील बनत चालला आहे. त्यामुळे या कामगारांना योग्यरित्या त्यांच्या गावी पोहोचविण्यासाठी पोलिसांच्या मदतीला मंत्रालयातील १४०० कर्मचारी-अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र यात क्लार्क, टायपिस्ट, असिस्टंट यांच्याबरोबर अवर सचिवांची नियुक्ती करण्यात आल्याने आमचं डिव्हॅल्युएशन केले की काय असा सवाल या नियुक्त अवर सचिवांकडून उपस्थित …

Read More »

रेकॉर्ड ब्रेक संख्या रूग्णांची मुंबईत तर राज्यात मृतकांची १४११ रूग्ण मुंबईत तर ७४ मृत पावले राज्यात

मुंबई: प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील रूग्ण संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून एकट्या मुंबईत दिवसभरात १४११ रूग्ण आढळून आले तर राज्यात उर्वरीत असे मिळून २ हजार १२७ रूग्णांचे निदान झाले. त्यामुळे राज्यातील रूग्णांची संख्या ३७ हजार १३६ झाले असून राज्यात ७४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. …

Read More »