Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

कोरोनापासून बचाव करायचाय तर हात मिळवू नका, हात स्वच्छ धुवा मुख्यमंत्री, आरोग्य सचिव प्रदीव व्यास, आयुक्त परदेशींची माहिती

मुंबईः प्रतिनिधी राज्यात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हात स्वच्छ धुवणे, हात मिळविण्याचे टाळावे, कोणाशीही बोलताना किमान तीन फुटाचे अंतर …

Read More »

कोरोनाची भीती नका बाळगू मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी भय‍भीत होवू नये. असे आश्वस्त करतानाच सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नका, होळी साजरी करताना तिचे स्वरुप मर्यादित ठेवा. मुंबई पाठोपाठ पुणे, नागपूर येथील विमानतळांवर थर्मल स्कॅनिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांची तपासणी करण्याचे निर्देश …

Read More »

शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंदणी चालू वर्षात १८ हजार कोटी रूपयांचे वाटप

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील कर्जमुक्त करण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेली असली तरी दुसऱ्याबाजूला शेतकऱ्यांच्या ७-१२ वर पुन्हा कर्जाची नोंद करण्याची व्यवस्था राज्य सरकारकडूनच करण्यात आल्याची माहिती आर्थिक सर्व्हेक्षण अहवालातून उघडकीस आली आहे. तत्कालीन भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३५ हजार कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली होती. यापैकी २५ …

Read More »

अपेक्षेप्रमाणे राज्याची अर्थव्यवस्था वाढलीच नाही ६.५ नव्हे तर ५.७ च्या गतीने अर्थव्यवस्था वाढणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी यंदाच्यावर्षी राज्याची अर्थव्यवस्था ६.५ टक्क्याने वाढणार असल्याची घोषणा तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. मात्र चालू वर्षासाठीच्या जाहीर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालानुसार राज्याची अर्थव्यवस्था ६.५ नव्हे तर ५.७ टक्क्याने वाढणार असल्याचे नमूद करण्यात आल्याने तब्बल १.५ टक्क्याने अर्थव्यवस्थेचा गाडा घसरल्याचे स्पष्ट होत आहे. विधिमंडळात २०१९-२० चा …

Read More »

अबु आझमी म्हणाले, एक महिना द्या सगळं बंद करून दाखवतो राज्य सरकारला आव्हान मादक द्रव्ये बंद करा अन्यथा

मुंबईः विशेष प्रतिनिधी मुंबईतील अनेक भागात नशेली पदार्थ मिळत आहेत. अशा पध्दतीच्या पदार्थांची विक्री बंद करणे राज्य सरकारच्या हातून होणार नसेल तर माझ्या हातात द्या एक महिन्यात अशा गोष्टी बंद करून दाखवतो असे आव्हान समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी राज्य सरकारला दिले. या आव्हानाची तात्काळ दखल घेत विधानसभाध्यक्ष पटोले …

Read More »

कॅगच्या न्यायालयात फडणवीस सरकार दोषी ऊर्जा, सिडको-नगरविकास, परिवहन, एमएसआरडीसीच्या कारभारावर ठपका

मुंबईः विशेष प्रतिनिधी गतीमान सरकार, पारदर्शक सरकारचा नारा देत राज्यात  विराजमान झालेल्या भाजपा सरकारने आपल्या कार्यकाळात विकासकामांच्या नावाखाली गुंतवणूक वाढविली. मात्र दुसऱ्याबाजूला या वाढविलेल्या गुंतवणूकीचा परतावा मिळविण्याऐवजी नुकसानीचा कारभार केला असून एमएसआरडीसी, परिवहन विभाग, ऊर्जा विभागाला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. तर सिडकोच्या निविदा वाटपात मोठ्या प्रमाणावर नियमांचे उल्लंघन …

Read More »

महाविकासच्या मंत्री, आमदारांवर उपमुख्यमंत्री कार्यालयाचे लक्ष दैनदिन हजेरी, चर्चेतील सहभागावर नजर

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेवर येवून चार महिने झाले. मात्र संख्याबळात तुकड्यांनी असल्याचा गैरफायदा भाजपाने घेवू नये यासाठी आघाडीच्या सर्व आमदार, मंत्र्यांवर विधानसभा आणि विधान परिषदेतील हजेरीवर धास्तावलेल्या उपमुख्यमंत्री कार्यालय अर्थात अजित पवार यांच्याकडून बारीक लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री …

Read More »

एमएमआरडीएचे १६ हजार कोटी मुंबई महापालिकेने थकविले नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी एमएमआरडीच्या माध्यमातून मुंबईत अनेक प्रकल्प राबविले जातात. भांडवली खर्चापैकी १६ हजार ६६४ कोटी एवढी रक्कम मुंबई महानगरपालिकेकडून एमएमआरडीएला येणे अपेक्षित आहे. या रकमेतून झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत एमएमआरडीएकडून ८८.७५ कोटी रक्कम मुंबई महानगर पालिकेला येणे अपेक्षित असल्याने ही रक्कम वजा करून उर्वरित रक्कम देण्यासाठी प्राधिकरणाने विनंती केली आहे. ही थकित …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, पंतप्रधान मोदींची योजना आल्यावर जाहीर करू शेतकऱ्यांना हमीभाव मिळणे अजूनही दूरच

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार महाविकास आघाडीकडून कर्जमाफी देणे सुरु करण्यात आले. मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव देण्याबाबत पंतप्रधान मोदींची हमीभाव योजना येणार असून त्याची वाट आम्ही बघत असल्याची खोचक टीका मोदी यांच्यावर करत ही योजना आल्यानंतर त्याचा अभ्यास करून महाविकास आघाडीची हमीभाव योजना …

Read More »

अर्थसंकल्पात पाणी पुरवठा खाजगीकरण, मोफत वीज, रेडिरेकनर दर कपातीचे संकेत ६ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी दिल्लीतील आप सरकारच्या धर्तीवर राज्यातील जनतेलाही मोफत पायाभूत सुविधा पुरविण्याचे संकेत यंदाच्या अर्थसंकल्पातून मिळत आहेत. यंदाचा अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सादर करण्यात येणार असून या अर्थसंकल्पातून राज्यातील १० महानगरपालिका आणि ग्रामीण भागातील सत्तेची केंद्रे पुन्हा ताब्यात मिळविण्यासाठी महाविकास आघाडीकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका …

Read More »